Chandrayaan 2: आनंदाची बातमी, विक्रम लँडरचे फोटो टिपण्यात 'नासा'ला यश

Chandrayaan 2: आनंदाची बातमी,  विक्रम लँडरचे फोटो टिपण्यात 'नासा'ला यश

चंद्राच्या पृष्ठभागावर आढळलं विक्रम लँडर, LRO कॅमेऱ्यानं टिपलेले फोटो 'नासा'नं केले ट्वीट.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: भारताच्या चांद्रयान 2 आ मोहीमेतल्या अतिशय महत्वाच्या अशा विक्रम लॅण्डरचा ठावठीकाणा शोधण्यात नासाच्या ऑर्बिटरला यश आलं आहे. नासाच्या एका उपग्रहाला विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधण्यात साधण्यात यश आलं आहे. Chandrayaan 2चं विक्रम लँडर चंद्रावर नेमकं कुठे आहे याचा ठावठिकाणाच लागत नव्हता.. पण नासाच्या एका ऑर्बिटरला विक्रम लॅणअडरच्या खुणा सापडल्या आहेत. विक्रम लँडर जिथे उतरणं अपेक्षित होतं त्यापेक्षा त्याचा खुणा जवळपास 750 मीटर दूर अंतरावर सापडल्या आहेत. त्यामुळे विक्रम लँडरचं हार्ड लँडिग झालं असल्याचा अंदाज या फोटोतून खरा होत असल्याचं दिसत आहे.

नासानं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 7 सप्टेंबर रोजी इस्त्रोकडून चांद्रयान 2 अंतराळात पाठवण्यात आलं होतं. लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम साधारण कुठे पडलेलं असू शकतं याचे संभाव्य फोटो इस्रोला पाठवले होते.. त्यांनंतर नासाने मंगळवारी पहाटे ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटरद्वारे हे छायाचित्र काढण्यात आलं आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातील काही फोटो समोर आले होते. मात्र फिक्सेल चांगले नसल्यामुळे विक्रम लँडरची पडताळणी करणं कठीण होतं. नोव्हेंबर महिन्यात मोजेक चांगल्या पद्धतीनं साथ देत असल्यामुळे काही छायाचित्र साधारण स्पष्ट होतील अशी समोर आली आहे. पण आता ऑर्बिटरने काल या ठिकाणाचे नव्याने फोटो घेतले आहेत.

First published: December 3, 2019, 7:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading