Chandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण? ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद!

जगभरातील अनेक देशांनी चंद्राची माहिती घेण्यासाठी मोहिम आखली आहे. पण आतापर्यंत कोणीही दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केला नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 04:00 PM IST

Chandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण?  ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद!

श्रीहरीकोटा, 22 जुलै: भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2चे काहीच क्षणापूर्वी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आता पुढील 48 दिवसात चांद्रयान-2 लँडर ऑर्बिटर चंद्राच्या भूमीवर उतरणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर येथून GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2ने उड्डाण केलं. ISROचे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. जगभरातील अनेक देशांनी चंद्राची माहिती घेण्यासाठी मोहिम आखली आहे. पण आतापर्यंत कोणीही दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केला नाही. जाणून घेऊयात चांद्रयान-2 या मोहितील खास अशा गोष्टीबद्दल...

दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण...

ISROचे चांद्रयान-2 चंद्राच्या ज्या भागावर उतरणार आहे त्याला डार्क साइड असे म्हणतात. या डार्क साईडबद्दल जगाला फार माहिती नाही. भारताच्या आधी चंद्राच्या भूमीवर पोहोचलेले अमेरिका, रशिया आणि चीन यांना दाखील या डार्क साइडवर पोहोचता आले नाही. भारताच्या चांद्रयान-1मध्ये दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याचे आढळले होते. त्यामुळेच आता चांद्रयान-2च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दलची अधिकची माहिती मिळवली जाणार आहे. चंद्रायान-2च्या माध्यमातून चंद्राच्या भौगोलिक वातावरणाचा, तेथील खनिजे, वातावरण आणि पाण्याची उपलब्धता याची माहिती मिळवली जाणार आहे. चांद्रयान-2च्या माध्यमातून भारताने अन्य देशांच्या तुलनेत आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच आहे की, भारत आतापर्यंत कोणीही पोहोचले नाही अशा ठिकाणी जात आहे.

अभिमानास्पद! CHANDRAYAAN-2 चं हे आहे 'महाराष्ट्र' कनेक्शन

दक्षिण ध्रुवावर असे आहे तरी काय?

Loading...

चंद्राचा दक्षिम ध्रुव हा खास असा आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चंद्राचा उत्तर ध्रुव हा अधिक काळ प्रकाशात असतो. दक्षिण ध्रुवावर पाणी होण्याची शक्यता याआधी देखील व्यक्त करण्यात आली होती. चंद्राच्या या डार्क साइड भागात बर्फाच्या स्वरुपात विश्वनिर्मितीच्या वेळी लुप्त झालेल्या जीवाश्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ चंद्राच्या निर्मिती संदर्भात नाही तर पृथ्वीच्या निर्मिती संदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर काय?

ISROचे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर भारत आतापर्यंत न मिळालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणार आहे. दक्षिण ध्रुवावर अशी खनिजे मिळू शकतात ज्यामुळे मानवाच्या पुढील 500 वर्षातील गरजांची पूर्ततात होऊ शकते. या खनिजांच्या विक्रीतून लाखो डॉलरची कमाई देखील होऊ शकते. चंद्रावरून मिळणारी ही ऊर्जा केवळ सुरक्षित असणार नाही तर ती प्रदूषण मुक्त देखील असेल.

चांद्रयान-2 झेपावलं...भारताची मोठी झेप, रचला इतिहास

चंद्रावरच इतका फोकस का?

स्टीफन हॉकिंग यांनी सांगितल्या प्रमाणे, आपण जर अंतराळात गेले नाही तर आपल्याला भविष्यच असणार नाही. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेला चंद्रच आपल्याला लांब पल्ल्याच्या अंतराळ मोहिमांमध्ये मदतीला येणार आहे. भविष्यातील मोठ्या मोहिमा आणि त्यासाठी तांत्रिक मदत आणि आवश्यक परिक्षण चंद्रावर करणे शक्य होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळेच चंद्रावर सर्वांचे लक्ष आहे.

VIDEO : ISRO ची गगनभरारी, Chandrayaan-2 चे यशस्वी प्रक्षेपण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...