Chandrayaan-2 : श्वास रोखून धरायला लावणारे ते क्षण...

Chandrayaan-2 : श्वास रोखून धरायला लावणारे ते क्षण...

'तुमचा देशाला अभिमान आहे. चढ उतार येतच असतात. तुमच्यामुळेच देशाने मोठी झेप घेतलीय. यातून खूप काही शिकायला मिळालं.'

  • Share this:

बंगळुरू 7 सप्टेंबर : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नियंत्रण कक्षात बसलेले, लँडर 'विक्रम'चा वेग कमी कमी होत होता. 'विक्रम' चंद्रापासून 2.1 किमी असतानाच लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटला. शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांना पुन्हा संपर्क करण्यात यश आलं नाही. शेवटी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी माहिती देत सांगितलं की विक्रमचा संपर्क तुटला आहे आणि संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. यावेळी आत्तापर्यंत आनंदी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती.

सर्व खात्री केल्यानंतर सिवन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व माहिती देत संपर्क तुटल्याचं सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान गॅलरीतून खाली  सर्व शास्रज्ञांमध्ये आले आणि त्यांनी सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, तुमचा देशाला अभिमान आहे. चढ उतार येतच असतात. तुमच्यामुळेच देशाने मोठी झेप घेतलीय. यातून खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही जे काही मिळवलं तेही काही कमी नाही. पुन्हा नव्याने मोहिम सुरू करू. मी तुमच्या सोबत आहे असं सांगत त्यांनी सर्वांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी देशभरातून आलेल्या मुलांशीही पंतप्रधान बोलले आणि त्यांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिलीत. आत्मविश्वास बाळगा, अपयशाने कधीही खचून जावू नका असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

दलिया आणि चहा : चिदंबरम यांचा तिहार तुरुंगातला पहिला दिवस

चांद्रयान-2 चा असा झाला प्रवास

- 22 जुलैला चांद्रयान-2 चंद्राकडे झेपावलं

-  यानाने 3 लाख 84 हजार किमीचं अंतर कापलं

- विक्रमचा प्रवास प्रतिसेकंद 6 किमी किंवा प्रतितास 21 हजार 600 किमी असा झाला.

- शेवटच्या काही क्षणांपर्यंत सर्व काही ठिक होतं. मात्र 2.1 किमीचं अंतर राहिलेलं असताना लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटला.

- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला असता.

-  चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरला असता.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 7, 2019, 3:14 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading