LIVE NOW

Chandrayaan-2 : तुम्ही प्रेरणेचा सागर आहात, पंतप्रधान मोदींनी वाढवलं इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं मनोधैर्य

आत्तापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी आणि अचूकपणे पार पडले असून हा शेवटचा टप्पाही यशस्वी होईल अशी आशा इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केलीय.

Lokmat.news18.com | September 7, 2019, 9:02 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 7, 2019
auto-refresh

Highlights

8:32 am (IST)

देशाला तुमचा अभिमान आहे, माझा तुमच्यावर विश्वास आहे - पंतप्रधान मोदी


Load More
बंगळुरू 07 सप्टेंबर : सर्व देश ज्या क्षणांची वाट बघत होता तो ऐतिहासिक क्षण काही वाट्याला आला नाही. लँडर 'विक्रम' चंद्रापासून फक्त 2.1 किमीवर असेपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. नंतर मात्र लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटला. शास्त्रज्ञांनी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ जाऊन त्यांना माहिती दिली. प्रचंड वेग असलेल्या लँडरचा वेग कमी करून त्याला अलगदपणे चंद्रावर उतवणं हा टप्पा, क्षण सगळ्यात महत्त्वाचे असतात. त्याच टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांना धीर देत अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, देशाला तुमचा अभिमान आहे. यश अपयश येतच असतं. इस्रो आणखी मोठी झेप घेईल यात शंका नाही.