• होम
  • व्हिडिओ
  • Chandrayaan-2 : अंतिम टप्प्यात विक्रम लँडरसोबत नेमकं काय झालं असेल?
  • Chandrayaan-2 : अंतिम टप्प्यात विक्रम लँडरसोबत नेमकं काय झालं असेल?

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 07:35 AM IST | Updated On: Sep 7, 2019 08:06 AM IST

    बंगळुरू, 07 सप्टेंबर: चंद्रावर उतरण्याच्या भारताच्या कित्येक वर्षांच्या स्वप्नाला सध्या धक्का बसला. विक्रम लँडर चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर आणि एक मिनिटाच्या अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान विक्रम लँडरच्या चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरू झाली. विक्रम आणि चंद्रातलं अंतर कमी करण्यात इस्रोला यश आलं. पण सॉफ्ट लँडिंगचा शेवटच्या खडतर टप्प्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं असतानाच विक्रमकडून सिग्नल येणं बंद झालं. त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी नजरा लावून बसलेल्या भारतीयांची निराशा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते. शास्त्रज्ञांना धीर त्यांनी त्यांचा अभिमान असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading