चांद्रयान -2 : NASA कडून मिळाले विक्रम लँडरसंदर्भात महत्त्वाचे फोटो, पुन्हा एकदा आशा पल्लवित

चांद्रयान -2 : NASA कडून मिळाले विक्रम लँडरसंदर्भात महत्त्वाचे फोटो, पुन्हा एकदा आशा पल्लवित

चांद्रयान -2 (Chandrayaan-2) च्या विक्रम लँडरशी संपर्क होण्याच्या आशेचे शेवटचे 2 दिवस शिल्लक असतानाच NASA ऑर्बिटरने (Orbiter) लँडर उतरलं त्या जागेचे काही फोटो पाठवले आहेत.

  • Share this:

ह्यूस्टन (अमेरिका), 19 सप्टेंबर :चांद्रयान -2 (Chandrayaan-2) च्या विक्रम लँडरशी Vikram Lander संपर्क साधण्याची आशा संपुष्टात येत असतानाच एक चांगली बातमी आली आहे. लँडरचं सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही हे सिद्ध करण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी असतानाच नासाच्या हाती काही फोटो आले आहेत. या छायाचित्रांमुळे आशेची धुगधुगी कायम राहणार आहे. (NASA) नासाच्या ऑर्बिटरने (Orbiter) लँडर उतरलं त्या जागेचे काही फोटो पाठवले आहेत. ISRO आता या फोटोंचा अभ्यास करत आहे.

नासाच्या चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबिटरने चांद्रयान उतरणार होतं त्या चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो घेतले आहेत. चांद्रयान 2 च्या मोहिमेत यानातलं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगसाठी तयार होतं. तसा प्रयत्नही केला गेला, पण अखेरच्या क्षणी लँडरशी संपर्क तुटला. आता त्या वेळी नेमकं काय झालं हे समजून घ्यायची शक्यता वाढली आहे. नासाने पाठवेलली छायाचित्र ISRO इस्रो अभ्यासणार आहे. इस्रोच्या प्रोजेक्ट सायंटिस्टने ही माहिती दिली आहे.

नासाच्या लूनार रिकन्सायन्स ऑरबिटर अंतराळयानाने जॉन केलर यांनी नासाचं निवेदन जाहीर केलं. त्यांच्या ऑरबिटरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसराची छायाचित्र घेतली आणि ती इस्रोला पाठवली असल्याची माहिती त्यांनी दिली.

केवळ 2 दिवस शिल्लक

लँडर विक्रम ऊर्जा निर्मिती करत आहे की नाही याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

हे वाचा - 'विक्रम'शी संपर्क तुटला तरीही Chandrayaan 2 यशस्वी, कसं ते जाणून घ्या

ISRO चे चेअरमन शिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध असलेल्या डेटाचा अॅनॅलिसिस करण्याचे काम सुरु आहे. विक्रमला केवळ एक लूनर डे या काळातच सूर्याची थेट ऊर्जा मिळणार आहे. एक लूनर डे म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस होय. या 14 दिवसांपैकी 12 दिवस वाया गेले आहेत. आता ISROकडे केवळ 2 दिवसाचा वेळ शिल्लक आहे.

हे वाचा - आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

चांद्रयान -2 मोहिमेतल्या विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला आणि अपेक्षित लँडिंग झालं नाही. त्यानंतर ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोंमधून लँडरचं लोकेशन कळलं. पण आता याबद्दल युरोपियन स्पेस एजन्सीच्या माहितीनुसार, विक्रम चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे तो धोकादायक भाग आहे. युरोपियन एजन्सीलाही तिथे लँडिंग करायचं होतं पण ती मोहीम सफल झाली नाही.

चंद्राचा दक्षिण ध्रुवावर इतका धोकादायक का?

युरोपियन स्पेस एजन्सीने चांद्रयानासारखीच ल्युनार लँडर नावाने अर मोहीम हाती घेतली होती. त्यांचं हे यान 2018 मध्ये चंद्रावर उतरणार होतं. पण बजेट कमी पडल्यामुळे ही मोहीम मध्येच थांबवण्यात आली. त्यावेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात काय धोके आहेत याचा एक अहवाल युरोपियन स्पेस एजन्सीने केला होता.त्यानुसार चंद्राच्या या भागात गुंतागुंतीचं पर्यावरण आहे.

रेडिएशनची धूळ

इथल्या पृष्ठभागावरच्या धुळीमध्ये विद्युतभार असलेले आणि रेडिएशन असलेले कण आहेत. लँडरच्या उपकरणांमध्ये इथली धूळ बसली तर यंत्र खराब होऊ शकतात. आता कॅनडा आणि जपान या देशांनीही 2020 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची योजना बनवली आहे. ही मोहीमही रोबोवरच आधारित आहे.

--------------------------------------------------------

VIDEO : आईची औषधं घेण्यासाठी लेक पुराच्या पाण्यात उतरला, बघ्यांनी मात्र व्हिडीओ काढला

First published: September 19, 2019, 9:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading