चांद्रयान 2 : ISRO ला अजुनही HOPE, लँडर विक्रमबद्दल दिली माहिती

चांद्रयान 2 : ISRO ला अजुनही HOPE, लँडर विक्रमबद्दल दिली माहिती

अखेरच्या क्षणी लँडर विक्रमशी संपर्क तुटल्यानं चांद्रयान मोहिमेत अपयश आलं होतं. त्यानंतर इस्त्रो विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 10 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेकडं जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. लँडर विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर त्याचा शोध लागला. ते सुरक्षित असल्याची माहिती इस्त्रोला मिळाली पण त्याच्या पुन्हा संपर्क होऊ शकलेला नाही. आता इस्रोने ट्विटरवरून अधिकृत माहिती देताना सांगितलं की, लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

इस्त्रोनं ट्विटरवर म्हटलं की, चंद्राच्या पृष्ठभूमीवर लँडर विक्रमचे हार्ड लँडिंग झालं होतं. मात्र, यामध्ये लँडर पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. इस्रो सातत्यानं लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

इस्रो विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी फक्त 11 दिवसांचा कालावधी उरला आहे. विक्रमचे हार्ड लँडिग झाल्यानंतरही पुर्ण सुरक्षित असल्याचं इस्त्रोनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, इस्त्रो लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत घेण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण नासाची एक मिशन लूनार रिॉनिसेन्स ऑर्बिटर चांद्रयान 2 पेक्षा चंद्राच्या जास्त जवळ आहे. त्यामुळं त्यांच्याकडून तपशिलवार माहिती मिळू शकेल.

नासाच्या लूनार रिकॉनिसेन्स ऑर्बिटरने चंद्राची 3डी छायाचित्रं घेतली आहेत. यामध्ये चंद्रामध्ये झालेले बदल स्पष्ट पाहता येतात. जर इस्त्रोने नासाच्या या ऑर्बिटरच्या डेटाचा वापर केला तर विक्रमच्या सध्याच्या स्थितीची माहिती समजू शकते. याआधी इस्त्रोनं नासाच्या ऑर्बिटरचा वापर लँडिग स्पॉटसाठी केला होता. सध्या ऑर्बिटरकडून आणखी माहिती मिळण्याची वाट पाहिली जात आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, शनिवारी आम्हाला लँडर विक्रमच्या लोकेशनची माहिती मिळाली होती. ऑर्बिटरनं त्याचा पहिला फोटो पाठवला होता. यामध्ये विक्रम त्याच्या थ्रस्टर्सवर उभा दिसत आहे. पण एका बाजूला झुकला आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी पुन्हा संपर्क होणं कठीण आहे. तरीही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा ऑर्बिटर त्याच्यावरून जातो तेव्हा संपर्क साधण्यासाठी जे करता येईल ते करत आहोत.

लँडर विक्रमला खालच्या बाजूला 5 थ्रस्टर्स आहेत. चंद्रावर सॉफ्ट लँडिग करायचे होते. यात लँडरचा जो भाग झुकला आहे त्यात असलेल्या अँटिनाने इस्रोकडून पाठवलेले संदेश स्विकारल्यास विक्रम पुन्हा एकदा काम सुरू करू शकतो.

इस्रो फोटोतून मिळणाऱ्या माहितीची वाट बघत आहे. सध्या विक्रमवर सुर्य किरणंही नीट पडत नाहीत. त्यामुळं विक्रमचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे समजू शकलेलं नाही. सुर्यकिर्ण पडल्यास विक्रम किती सुस्थितीत आहे हे समजेल. यासाठी दोन ते तीन दिवस आणखी लागतील.

VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीला भविष्य नाही; मत वाया घालवू नका, पंकजा मुंडे आक्रमक

Published by: Suraj Yadav
First published: September 10, 2019, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading