Chandrayaan-2 : ISROच्या शास्त्रज्ञांचा श्वास रोखून ठेवणारा तो एक तास!

शास्त्रज्ञांसाठी हे काउंटडाऊन अतिशय महत्त्वाचं असतं. या काळातल्या प्रत्येक सेकंदांचं प्लानिंग ठरलेलं असतं. अतिशय बारीक सारिक गोष्टींचं नियोजन केलं जातं. शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची कठोर मेहेनत आणि संशोधन याचा कस त्या शेवटच्या क्षणांमध्ये लागणार असतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 04:24 AM IST

Chandrayaan-2 : ISROच्या शास्त्रज्ञांचा श्वास रोखून ठेवणारा तो एक तास!

श्रीहरीकोटा 15 जुलै : 'चांद्रयान-2' या मोहिमेकडे सर्व देशाचच नाही तर जगाचंही लक्षं लागलं होतं. कारण ही मोहीम स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारीत होती. इस्रोच्या कारकिर्दीतली ही सर्वात महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी मोहीम होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम आता थोडी लांबणीवर पडलीय.इस्रोचे शेकडो शास्त्रज्ञ या मोहिमेवर गेली कित्येक वर्ष कठोर मेहेनत घेत होतो. शेवटच्या तासात त्यांचा श्वास रोखला होता. आणि जे होऊ नये असं सगळ्यांना वाटत होतं तेच घडलं आणि चंद्रावरची झेप लांबणीवर पडली.

अशा सर्वच मोहिमांमध्ये अतंराळातल्या प्रक्षेपणाच्या आधी काही तास काउंटडाऊन सुरू होतं. शास्त्रज्ञांसाठी हे काउंटडाऊन अतिशय महत्त्वाचं असतं. या काळातल्या प्रत्येक सेकंदांचं प्लानिंग ठरलेलं असतं. अतिशय बारीक सारिक गोष्टींचं नियोजन केलं जातं. शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची कठोर मेहेनत आणि संशोधन याचा कस त्या शेवटच्या क्षणांमध्ये लागणार असतो.

VIDEO: Chandrayaan-2चं प्रक्षेपण रद्द करण्याच्या कारणांचा ISROनं केला खुलासा

...आणि नियोजन बिघडलं

त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ आपलं सर्वच पणाला लावून काम करत असतात. एखादी सुक्ष्म चूकही सर्व मेहेनतीवर पाणी फिरवू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्टी काटेकोरपणेच केली जाते. चांद्रयान-2 मोहिमेत शेवटच्या तासापर्यंत सर्व गोष्टी नियोजना प्रमाणे पार पडत होत्या. प्रक्षेपणाला  56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले होतं. शेवटच्या काळात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे रॉकेटमध्ये इंधन भरण्याचं. क्रायोजिनिक इंजिनाच्या मदतीने रॉकेट अवकाशात झेपावत असतं.

Loading...

याच इंजिनमध्ये इंधन भरत असताना शास्त्रज्ञांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यात त्यांना तांत्रिक दोष आढळून आला. त्यामुळे काउंटडाऊन रोखण्यात आलं आणि प्रक्षेपण रद्द करण्यात आलं.

Chandrayaan- 2 असं उभं राहिलं 'चांद्रयान-2', ISROचा Exclusive Video

जे घडू नये ते घडले

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचं आजचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलंय. प्रक्षेपणाला  56 मिनिटं आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन रोखण्यात आलं. काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने हा निर्णय घेतला. पहाटे 2 वाजून 51 मिनिटांची चांद्रयानाचं उड्डाण होणार होतं. मात्र क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण रोखण्यात आल्याचं इस्रोने म्हटलं आहे.

रॉकेटमध्ये जेवढं इंधन भरण्यात आलं होतं ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केलीय. रॉकेटमध्ये भरलेलं सर्व इंधन खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 04:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...