चांद्रयान 2चा संपूर्ण प्रवास; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल ISROला सॅल्यूट!

चांद्रयान 2चा संपूर्ण प्रवास; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल ISROला सॅल्यूट!

जाणून घेऊयात येणाऱ्या 17 दिवसात चांद्रयान 2ला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा, 20 ऑगस्ट: भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) (ISRO)च्या चांद्रयान 2(Chandrayaan 2) ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आज चांद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. चांद्रयान 2 मोहिमेतील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती 7 सप्टेंबरची जेव्हा चांद्रयान 2 मधील रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरेल. पण त्याआधी चांद्रयान 2ला अनेक महत्त्वाचे टप्पे पार करावे लागणार आहेत. जाणून घेऊयात येणाऱ्या 17 दिवसात चांद्रयान 2ला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

चंद्राच्या अगदी जवळ

श्रीहरीकोटा येथून 22 सप्टेंबर रोजी GSLV मार्क III-M1च्या मदतीने चांद्रयान 2ने भरारी घेतली होती. भारताचे चांद्रयान 2ने आतापर्यंत 3 लाख 84 हजार किलो मीटरचा प्रवास पार केला आहे. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर आता चांद्रयान 2 ला 18 हजार किलो मीटरचे अंतर पार करायचे आहे.

चार महत्त्वाचे टप्पे

चांद्रयान 2 आणखी 4 टप्पे आणि कक्षा पार करायच्या आहेत. इस्रोच्या मते चांद्रयान 2 ची दिशा वेग वेगळ्या दिवशी बदलली जाईल. नियोजित तारखेनुसार 21, 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 ची दिशा बदलली जाईल. त्यानंतर चांद्रयान 2 चंद्रापासून केवळ 100 किलो मीटरवर असेल. 7 सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल.

ते 15 मिनिट असतील कळीचे

चांद्रयान 2 मोहिमेतील लँडिंगच्या वेळी 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चंद्राच्या भूमीपासून 30 किलो मीटर अंतरावर लँडिंगच्या आधी चांद्रयान 2चा वेग अंत्यत कमी केला जाईल. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत जर यशस्वी ठरला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा देश ठरेल. अशी कामगिरी आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केली आहे.

चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर 6 चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे.

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 20, 2019, 6:06 PM IST
Tags: isromoon

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading