आशा जवळ जवळ संपुष्टात; मिट्ट काळोख आणि -183 तापमानात 'विक्रम' एकटा!

आशा जवळ जवळ संपुष्टात; मिट्ट काळोख आणि -183 तापमानात 'विक्रम' एकटा!

चंद्रावर काही तासातच लुनर डे संपणार आहे आणि त्यानंतर विक्रमशी संपर्क करणे तर दूरची गोष्ट त्याच फोटो देखील काढता येणार नाही.

  • Share this:

श्रीहरीकोटा, 20 सप्टेंबर: चंद्रा(moon) च्या दक्षिण ध्रुवावर रात्र होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO)पाठवण्यात आलेल्या चांद्रयान 2(Chandrayaan 2)चे लँडर विक्रम (Lander Vikram) चंद्र भूमीवर आहे. चंद्रावर रात्र होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. ISRO सह करोडो भारतीयांच्या स्वप्नावर काळोख पसरण्याची शक्यता आहे. चंद्रावर काही तासातच लुनर डे संपणार आहे आणि त्यानंतर विक्रमशी संपर्क करणे तर दूरची गोष्ट त्याचा फोटो देखील काढता येणार नाही.

चंद्राच्या ज्या भागावर विक्रम कोसळला आहे तेथे काळोख इतका असतो की कोणतीही गोष्ट पाहता येत नाही. ISROच नाही तर जगभरातील अन्य कोणतीही अवकाश संशोधन संस्था विक्रमचा फोटो घेऊ शकत नाही. चंद्रावर पुढील 14 दिवस रात्र असणार आहे. अशा परिस्थितीत 14 दिवस लँडर विक्रम कोणत्याही मदतीशिवाय चंद्रावर एकटे असेल. त्यामुळे विक्रम सुरक्षित राहिला या याबाबद देखील शंका आहेत. कारण पुढील 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र असणार आहे. तसेच तेथील तापमान वजा 183 डिग्री सेल्सियस इतके असेल. अशा वातावरणात लँडर विक्रम सुरक्षित राहिल का? असा प्रश्न आहे. इतक्या कमी तापमानात विक्रममधील अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होऊ शकतात. जर विक्रममध्ये रेडिओआयसोटोप हीटर युनिट लावले असते तर ते सुरक्षित राहिले असते. या सर्व परिस्थितीमुळेच लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याच्या आशा जवळपास संपुष्ठात आल्या आहेत.

...यामुळे संपर्क तुटला

चांद्रयान 2 मधील लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न ISROने केले. पण त्यात यश आले नाही. लँडर विक्रमचे चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंग होणार होतो. पण अखेरच्या काही मिनिटामध्ये संपर्क तुटल्याने विक्रमचे हार्ड लँडिंग झाले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 1 हजार 471 किलो ग्रॅम वजनाचा विक्रम आणि त्याच्या सोबत 27 किलोग्रॅमचा रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर कोसळला. या संदर्भात मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ऑटोमॅटिक लँन्डिंग प्रोग्राममध्ये झालेल्या गडबडीमुळे विक्रमचे हार्ड लँन्डिंग झाले आणि ते चंद्रभूमीवर कोसळले.

दरम्यान, काल (गुरुवारी) नासाच्या ऑर्बिटरने (Orbiter) लँडर उतरलं त्या जागेचे काही फोटो पाठवले होते. नासाच्या लूनार रिकन्सायन्स ऑरबिटर अंतराळयानाने जॉन केलर यांनी नासाचं निवेदन जाहीर केलं. त्यांच्या ऑरबिटरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसराची छायाचित्र घेतली आणि ती इस्रोला पाठवली असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या फोटोमुळे त्या वेळी नेमकं काय झालं हे समजून घ्यायची शक्यता वाढली आहे.

CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

Published by: Akshay Shitole
First published: September 20, 2019, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading