Chandrayaan 2 : ISRO च्या 'विक्रम'ला NASA देणार मदतीचा हात?

विक्रम सुरक्षित असले तरी त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त 11 दिवस उरले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 11:50 AM IST

Chandrayaan 2 : ISRO च्या 'विक्रम'ला NASA देणार मदतीचा हात?

बेंगळुरू, 10 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान मोहिमेला अखेरच्या क्षणी यशानं हुलकावणी दिली. लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रमचे फोटो इस्रोला पाठवले. सध्या इस्रो विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी फक्त 11 दिवसांचा कालावधी उरला आहे. विक्रमचे हार्ड लँडिग झाल्यानंतरही पुर्ण सुरक्षित असल्याचं इस्त्रोनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, इस्त्रो लँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत घेण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण नासाची एक मिशन लूनार रिॉनिसेन्स ऑर्बिटर चांद्रयान 2 पेक्षा चंद्राच्या जास्त जवळ आहे. त्यामुळं त्यांच्याकडून तपशिलवार माहिती मिळू शकेल.

नासाच्या लूनार रिकॉनिसेन्स ऑर्बिटरने चंद्राची 3डी छायाचित्रं घेतली आहेत. यामध्ये चंद्रामध्ये झालेले बदल स्पष्ट पाहता येतात. जर इस्त्रोने नासाच्या या ऑर्बिटरच्या डेटाचा वापर केला तर विक्रमच्या सध्याच्या स्थितीची माहिती समजू शकते. याआधी इस्त्रोनं नासाच्या ऑर्बिटरचा वापर लँडिग स्पॉटसाठी केला होता. सध्या ऑर्बिटरकडून आणखी माहिती मिळण्याची वाट पाहिली जात आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, शनिवारी आम्हाला लँडर विक्रमच्या लोकेशनची माहिती मिळाली होती. ऑर्बिटरनं त्याचा पहिला फोटो पाठवला होता. यामध्ये विक्रम त्याच्या थ्रस्टर्सवर उभा दिसत आहे. पण एका बाजूला झुकला आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी पुन्हा संपर्क होणं कठीण आहे. तरीही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा ऑर्बिटर त्याच्यावरून जातो तेव्हा संपर्क साधण्यासाठी जे करता येईल ते करत आहोत.

चांद्रयान 2 : ISROसाठी पुढील 288 तास निर्णायक!

लँडर विक्रमला खालच्या बाजूला 5 थ्रस्टर्स आहेत. चंद्रावर सॉफ्ट लँडिग करायचे होते. यात लँडरचा जो भाग झुकला आहे त्यात असलेल्या अँटिनाने इस्रोकडून पाठवलेले संदेश स्विकारल्यास विक्रम पुन्हा एकदा काम सुरू करू शकतो.

Loading...

इस्रो फोटोतून मिळणाऱ्या माहितीची वाट बघत आहे. सध्या विक्रमवर सुर्य किरणंही नीट पडत नाहीत. त्यामुळं विक्रमचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे समजू शकलेलं नाही. सुर्यकिर्ण पडल्यास विक्रम किती सुस्थितीत आहे हे समजेल. यासाठी दोन ते तीन दिवस आणखी लागतील.

VIDEO: युतीचं सरकार आल्यावर कोण होणार मुख्यमंत्री? रामदास आठवले म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...