मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजपाच्या निवडक मंत्र्यांची ‘खाने पे चर्चा’, चंद्रकांत पाटलांच्या भोजन सोहळ्यात काय ‘शिजणार’, याकडे लक्ष

भाजपाच्या निवडक मंत्र्यांची ‘खाने पे चर्चा’, चंद्रकांत पाटलांच्या भोजन सोहळ्यात काय ‘शिजणार’, याकडे लक्ष

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व मंत्र्यांना (BJP Ministers from Maharashtra) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State president Chandrakant Patil) यांनी भोजनाचे आमंत्रण (Dinner Invitation) धाडले आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व मंत्र्यांना (BJP Ministers from Maharashtra) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State president Chandrakant Patil) यांनी भोजनाचे आमंत्रण (Dinner Invitation) धाडले आहे. दिल्लीतील रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी (Raosaheb Danve's residence) भाजपचे सर्व मंत्री भोजनासाठी एकत्र जमणार असून अऩौपचारिक गप्पांसाठी हा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सर्व मंत्री तिथे आहेत. त्यात चंद्रकांत पाटील हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे सर्व मंत्र्यांना एकत्र बोलावून पुढील राजकीय रणनिती आखण्यासाठी या संधीचा वापर भाजप करून घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या भोजन सोहळ्याचं निमंत्रण भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना धाडण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणं नव्यानं मंत्रिमंडळात दाखल झालेले  केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनादेखील निमंत्रित करण्यात आलं आहे.

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून आपल्याला दिल्लीला येता न आल्यामुळे महाराष्ट्रातील दिल्लीत असणाऱ्या अनेक मंत्र्यांची भेट होऊ शकली नव्हती. आता आपण दिल्लीत असल्यामुळे आणि अधिवेशनामुळे मंत्रीदेखील दिल्लीत असल्यामुळे हा योग जुळून येत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचा -दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाढवली, बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर अलर्ट

निर्णायक सोहळा

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काही महत्तवपूर्ण रणनिती ठरण्याची शक्यता आहे. त्यात गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील या भोजन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यामुळे ही बैठक राजकीय घडामोडींमधील एक निर्णायक बैठक ठरू शकते, असंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, Delhi