चंद्रबाबू नायडूंचा निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचा इशारा

चंद्रबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 12:41 PM IST

चंद्रबाबू नायडूंचा निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचा इशारा

हैद्राबाद, 14 एप्रिल : तेलगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाविरोधात आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. गुरूवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यावेळी आंध्र प्रदेशातील 100 ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या. त्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आणि किमान 50 टक्के व्हिव्हीपॅट जुळवण्याची मागणी यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी केली. शिवाय, यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता वाढेल असं देखील नायडू यावेळी बोलले. पण, आयोगानं मात्र या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. यावेळी नायडू यांनी निवडणूक आयोग प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप केला. तसेच आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. तर, 150 पोलिंग बुथवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी देखील यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली.


काँग्रेसच्या योजनेचे 72 हजार रूपये कसे मिळणार? या नंबरवर कॉल करा आणि जाणून घ्या


2 कार्यकर्त्यांचा मृत्यू

Loading...

पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले होते. त्यामध्ये दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू देखील झाला. यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता. मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये टीडीपीच्या आणि वायएसआर काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम मशिन्स खराब झाली होती. त्यामुळे मतदान ठप्प झालं. याच काळात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसांत भिडले.


SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...