• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • चंद्राबाबू नायडू भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नेमकं कारण काय?

चंद्राबाबू नायडू भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले, नेमकं कारण काय?

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले

आंध्र प्रदेश विधानसभेचा अधिवेशनाचा (Andhra Pradesh Assembly session) आज पहिलाच दिवस होता. या अधिवेशना दरम्यान कृषी क्षेत्राशी संबंधित विषयावर चर्चा सुरु होती. या चर्चादरम्यान सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे नेते (YSR Congress leaders) आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली.

 • Share this:
  हैदराबाद, 19 नोव्हेंबर : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (TDP) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आज भर पत्रकार परिषदेत (Press Conference) ढसाढसा रडले. त्यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरदेखील (Social Media) व्हायरल होत आहे. विधासभेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी चंद्राबाबू यांच्या पत्नीशीसंबंधित अपमानास्पद शब्दांत टीका केली. ही टीका नायडू यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे ते व्यथित झाले. त्यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी सत्तेत आल्यानंतरच विधानसभेत पाय ठेवेन, असं विधान केलं. त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

  नेमकं प्रकरण काय?

  आंध्र प्रदेश विधानसभेचा अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस होता. या अधिवेशना दरम्यान कृषी क्षेत्राशी संबंधित विषयावर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे नेते आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली. यावेळी वायएसआर काँग्रेसच्या काही सदस्यांनी चंद्राबाबू यांना वैयक्तित टीका केली. त्यांनी चंद्राबाबू यांच्या पत्नीबाबत अत्यंत अपमानास्पद शब्दांत टीका केली. या टीकेने चंद्राबाबू खचले. त्यांचा चेहरा पडला. ते सभागृहातून बाहेर पडले आणि विधानसभेतील त्यांच्या कक्षात गेले. यावेळी त्यांच्या पक्षाचे इतर सदस्यही त्यांच्या कक्षात गेले. पक्षाच्या सदस्यांनी नायडू यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळानंतर चंद्राबाबू यांनी जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही, असा निश्चय केला. हेही वाचा : तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर तेलगू देसम पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना चंद्राबाबू बराच वेळ काहीच बोलले नाही. ते भर पत्रकार परिषदेत चेहऱ्यावर हात ठेवून ढसाढसा रडले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या पत्नीसंबंधित टीकेवर नाराजी व्यक्त केली. हेही वाचा : Farm Laws मागे घेतल्यानंतर मोदी सरकारबद्दल पाकिस्तानी माध्यमांनी काय म्हटलंय?

  चंद्राबाबू पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

  "गेल्या अडीच वर्षांपासून मी अपमान सहन करतोय. पण शांत राहिलो. त्यांनी आज माझ्या पत्नीवर निशाणा साधला. मी सगळ्यांना सन्मान दिला. मी सन्मानाने वागलो आणि सन्मानाने जगलो. मी आता या गोष्टींना आणखी सहन करु शकत नाही", असं चंद्राबाबू म्हणाले. "माझी पत्नी कधीच राजकारणात नव्हती. माझ्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येत पावलांवर मला प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त माझ्या पत्नीने राजकारणात हस्तक्षेप केला नाही. मी सत्तेत होतो तेव्हाही आणि सत्तेत नसतानाही माझी पत्नी राजकारणात नव्हती. तरीदेखील विरोधक त्यांच्याबद्दल अपमानकारक बोलत आहेत. मी माझ्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत इतका मोठा अपमान कधीच सहन केला नाही. मी आतापर्यंत अनेक संघर्ष बघितले. विधानसभेत भरपूर वादविवाद बघितले. पण इतका वाईट अनुभव कधीच आला नव्हता", अशा शब्दात चंद्राबाबू यांनी खंत व्यक्त केली.
  Published by:Chetan Patil
  First published: