Home /News /national /

ताशी 110 किमी वेगानं धडधडत स्टेशन पार करून गेली ट्रेन; मागे रेल्वे स्टेशनची इमारतच झाली जमीनदोस्त

ताशी 110 किमी वेगानं धडधडत स्टेशन पार करून गेली ट्रेन; मागे रेल्वे स्टेशनची इमारतच झाली जमीनदोस्त

Railway Station Building Collapsed: 110 किमी प्रति तास वेगानं रेल्वे गाडी येवून गेली, मात्र तिच्या या जोरात वेगामुळं जमीन चांगलीच हादरली. इतकी की, रेल्वे स्टेशनची इमारत गदागदा हलली आणि कोसळली

    बुरहानपूर, 27 मे : रेल्वे गाड्यांचा वेग जास्तीत जास्त करण्याचा तंत्रज्ञानाद्वारे प्रयत्न सुरू असतो. मात्र आपल्या इकडच्या रेल्वे गाड्यांचा वेग खरंच मोठ्या प्रमाणात वाढला तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण समोर आलंय. ताशी 110 किमी वेगानं रेल्वे गाडी येवून गेली, मात्र तिच्या या जोरात वेगामुळं जमीन चांगलीच हादरली. त्यामुळं झालं असं की, तेथील रेल्वे स्टेशनची इमारत गदागदा हलली आणि कोसळली (railway station building collapsed). सुदैवानं इमारत कोसळताना खाली कोणी नसल्यानं जीवितहानी झाली नाही. पुष्पक एक्सप्रेस (pushpak express) गाडी येऊन गेल्यानंतर ही घटना घडली. मात्र नेहमीच ही गाडी तितक्याच वेगात येथून जात असते. देशातील कदाचित ही पहिलीच घटना आहे की, रेल्वे वेगात येवून गेल्यानंतर एखाद्या रेल्वे स्टेशनची इमारत कोसळली असावी. तसं पहायला गेलं तर ही इमारत फार जुनी होती असाही काही भाग नव्हता. या इमारतीचं बांधकाम होऊन 14 वर्षे झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशमधील बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर ते असीगडच्या दरम्यान असलेल्या चांदणी रेल्वे स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. कंपन इतके जोरदार झाले होते की, स्टेशन अधीक्षकांच्या खोलीच्या खिडकीची अगोदर काच फुटली. तेथील फलक खाली पडले आणि प्लॅटफॉर्मवर सर्व साहित्य विखरून पडल्याचं दिसून आलं. घटनास्थळी तैनात असलेले एएसएम (ASM) प्रदीपकुमार पवार रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी बाहेर आले. मात्र, परिस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि इमारतीचा भाग कोसळताना पाहून त्यांनी तेथून लगेच पळ काढला त्यामुळे ते बचावले. या घटनेची माहिती मिळताच भुसावळहून एडीआरएम मनोज सिन्हा, खंडवा एडीएन अजय सिंग, सीनियर डीएन राजेश चिकले हे ताबडतोब या रेल्वे स्टेशनमध्ये घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची चौकशी केली. भुसावळ, खंडवा, बुरहानपूरचे RPF आणि GRP घटनास्थळावर तैनात करण्यात आले आहेत. हे वाचा - ‘मी तेव्हा 35 वर्षांचा होतो…’; ‘ऐ दिल है मुश्कील’ मधील तो प्रसंग करण जोहरच्या आयुष्यावर आधारीत या घटनेनंतर पुष्पक एक्सप्रेस 1 तास थांबवण्यात आली होती. याव्यतिरिक्त इतर गाड्यांच्या वेळांवरही 30 मिनिटे परिणाम झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास लांब पल्ल्याच्या चार गाड्या थांबविण्यात आल्या. त्यानंतर हळूहळू प्रत्येक ट्रेन सोडण्यात आली. सध्या प्राधिकरणाचे पत्र देऊन सर्व अप व डाऊन रिकाम्या जागा रिकाम्या केल्या जात आहेत. दिल्ली-मुंबईच्या सर्वात रहदारीच्या मार्गावरील स्टेशन  चांदणी रेल्वे स्थानक हे देशातील सर्वात रहदारीच्या मुंबई-दिल्ली रेल्वे ट्रॅकवर आहे. भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार चांदणी स्थानकातील इमारतीच्या एका भागाचे छत कोसळले असून, ते दुरुस्त केले जाईल. पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. सर्व गाड्या नियमित धावत आहेत, या घटनेत फारसे नुकसान झालेले नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Indian railway, Railway accident

    पुढील बातम्या