Home /News /national /

आजारी पडला म्हणून चोराला रुग्णालयात केलं दाखल, रिपोर्ट आल्यानंतर हादरलं संपूर्ण पोलीस स्टेशन

आजारी पडला म्हणून चोराला रुग्णालयात केलं दाखल, रिपोर्ट आल्यानंतर हादरलं संपूर्ण पोलीस स्टेशन

एका चोराने धोक्यात टाकला 17 पोलिसांचा जीव. संपूर्ण शहरात सध्या चिंतेचे वातावरण आहे.

    चंदीगढ, 10 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची आणि कोव्हिड-19मुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांमध्येच भीतीचे वातावरण आहे. पंजाबमधील लुधियाना येथून एका चोरास अटक केली गेली. दोन दिवसानंतर, जेव्हा त्यांची तब्येत बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चोराची चाचणी पॉझिटिव्ह आढळली. यानंतर पोलिस ठाण्यात खळबळ उडाली. त्यामुळे तब्बल 17 पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लुधियानामध्ये घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ माजली आहे. 17 पोलिसांना क्वारंटाइन केल्यानंतर इतर पोलिसांचीही चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चोराच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या सुरू आहे. या चोराला कम्युनिटी ट्रान्समिशनमधूनच कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. वाचा-कोरोनच थैमान सुरू असताना देशातील 40 जिल्ह्यांमधून Good News! पंजाबमधील बरीच गावं सध्या कोरोनामुळे हॉटस्पॉट घोषित करण्यात आली आहेत. पंजाबमधील जवाहरपूर गावही हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या 21 प्रकरणांनंतर पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील डेरा बस्सीचे जवाहरपूर गाव कोरोनाचे नवीन केंद्र झाले आहे. येथील सरकारी आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. वाचा-कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा धोका वाढला, एकाच दिवसात 6 रुग्ण आढळले पंजाबमधील काही गावं केली सील दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या काही गावांत कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर ही गावं सील करण्यात आली आहेत. 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात ाला आहे. 4l एप्रिलला गावातील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आणखी २० लोकांना यात संसर्ग झाल्याचे आढळले आहे. गावात नोंदवलेल्या 21 प्रकरणांपैकी 14 प्रकरणे ही या व्यक्तीच्या संपर्कातील होती. वाचा-कोरोनामुळे 'हा' देश हतबल, शिंकणाऱ्यांविरुद्ध दहशतवादाचा गुन्हा केला दाखल
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या