तूच प्रश्न विचारणार का? असं म्हणत खासदार पत्रकाराच्या अंगावर गेले धावून!

तूच प्रश्न विचारणार का? असं म्हणत खासदार पत्रकाराच्या अंगावर गेले धावून!

भर पत्रकार परिषदेत भगवंत मान यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संतापून अंगावर धावून गेले.

  • Share this:

चंदीगड, 24 डिसेंबर : आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) चे खासदार भगवंत मान यांचा एक धक्कादायक व्हिडिओसमोर आला आहे. भर पत्रकार परिषदेत भगवंत मान यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संतापून अंगावर धावून गेले.

चंदीगडमध्ये मंगळवारी आपच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मान यांना विरोधक म्हणून तुमची भूमिका काय आहे? असा सवाल केला होता. यावर भगवंत मान यांचा एकच उद्रेक पाहण्यास मिळाला. रागाच्या भरात मान हे पत्रकारावरच धावून गेले. यावेळी उपस्थितीत पत्रकार आणि मान यांच्यात वाद पेटला. भगवंत मान यांनी पत्रकारांना दुसरे प्रश्न विचार, असा आग्रह धरला होता.  परंतु, पत्रकारांनी सुखबीर सिंह बादल यांच्याबद्दल प्रश्न विचारले. त्यानंतर हा वाद झाला.

आम आदमी पार्टीकडून कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतरही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  पत्रकारांनी मान यांना विचारलं की, पंजाब सरकारच्या विरोधात अकाली दल रस्त्यावर निदर्शनं करत आहे, पण आपचे नेते कुठेही दिसत नाही? याच प्रश्नावर मान यांना राग अनावर झाला.  मान यांनी सुखबीर बादल यांच्याबद्दल खालच्या शब्दात टीका केली. तसंच अकाली दल कुठेही नाही फक्त आम आदमी पार्टीच आहे. आम्हालाच सारखे प्रश्न विचारले जातात, असं म्हणत मान यांनी मीडियावरच खापर फोडलं.

पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडली

पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांकडून प्रश्न विचारले जात होते तेव्हा भगवंत मान पत्रकारावर चांगलेच भडकले. फक्त तूच मला प्रश्न विचारणार का? असं म्हणत मान यांनी संताप व्यक्त केला. तेव्हा पत्रकारांनीही तुमच्या मर्जीप्रमाणे प्रश्न विचारले जाणार नाही, असं ठणकावून सांगितलं. त्यानंतर वाद वाढत गेला आणि भगवंत मान यांनी पत्रकारांनाच चार शब्द सुनावले आणि त्यानंतर पत्रकार परिषद सोडून निघून गेले. पत्रकारांनीही भगवंत मान यांच्या वागणुकीमुळे पत्रकारांनीही आपच्या या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

Published by: sachin Salve
First published: December 24, 2019, 7:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading