राहुल गांधी नवज्योतसिंग सिद्धूवर नाराज, शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता

राहुल गांधी नवज्योतसिंग सिद्धूवर नाराज, शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता

नवज्योतसिंग आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पहिल्यापासूनच फारसं पटलं नाही. त्यामुळे वाद निर्माण झाला.

  • Share this:

नवी दिल्ली 21 मे : आपल्या भाषणांमुळे कायम चर्चेत असलेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत आले आहेत. सिद्धू यांच्या भूमिकेमुळे पंजाब काँग्रेसमध्येही वादाची ठिणगी पडलीय. सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरुद्ध जे वक्तव्य केलं त्याची दखल राहुल गांधी यांनी घेतली असून पंजाब काँग्रेसकडून त्याचा अहवाल मागितला आहे. राहुल गांधीही सिद्धूवर नाराज असल्याचंही बोललं जातं.

नवज्योतसिंग आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पहिल्यापासूनच फारसं पटलं नाही. मात्र राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी असलेली जवळीक आणि लाभलेलं वलय यामुळे सिद्धू यांची मंत्रीपदावर वर्णी लागली होती. निवडणुकीच्या प्रचारात नवजोत कौर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंगांनीच आपलं निवडणुकीचं तिकिट कापलं असा आरोप केला होता.

सिद्धूनेही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली होती. या टीकेने भडकलेल्या अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि त्यासाठीच तो वाट्टेल ती टीका करत असल्याचा आरोप केला होता. सिंग यांच्या या टीकेमुळे परिस्थिती आणखीच बिघडली. पक्षश्रेष्ठींनी सिद्धूवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

निवडणूक झाल्यावर आता राहुल गांधी यांनी त्याची दखल घेतलीय. राहुल यांच्या ऑफिसकडून सिद्धूच्या वादग्रस्त वक्तव्याचं फुटेज मागविण्यात आलंय तसच प्रदेश काँग्रेसला अहवालही मागितला आहे. राज्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकली होती त्यामुळे राहुल गांधी यांना अमरिंदर सिंग यांना नाराज करून चालणार नाही. त्यामुळे सिद्धू यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.

First published: May 21, 2019, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading