चंदीगढ, 23 ऑक्टोबर : पंजाबची राजधानी असलेल्या चंदीगढमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात वऱ्हाडी बनून आलेल्या एका व्यक्तीनं वधूच्या आईची बॅग चोरुन पळून गेला. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगमध्ये साडेतीन लाख रुपये, 2 मोबाइल फोन, डायमंडचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या होत्या. लग्नाच्या कार्यक्रमातून बॅग अशा प्रकारे चोरी झाल्यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली.
तक्रारदार उषा ठाकूर यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीच्या लग्नात त्यांची बॅग चोरीला गेली. या बॅगमध्ये दागिन्याबरोबरच अहेराचे पैसही होते.
वाचा-मास्क घालायला सांगितल्याने विमानात धिंगाणा; सहप्रवाशांवर खोकली महिला VIDEO VIRAL
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला खासगी म्हटले आहे. तक्रार आणि प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक आणि शेजारच्या राज्यांतील पोलिसांना फुटेज व छायाचित्रे पाठविली आहेत जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर अटक करता येईल.
वाचा-10 वर्षांच्या मुलानं मृत्यूला दिली हुलकाणी, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
स्टेजवर बॅगमध्ये छेडछाड करताना दिसला
तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज शोधले, ज्यात एक व्यक्ती बॅगमध्ये छेडछाड करताना दिसला. पोलिसांचे म्हणणे आहे की सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर असे वाटते की तो कुटूंबातील सदस्य आहे. एवढेच नाही तर ही व्यक्ती वधूची आई तसेच, वधू आणि वर यांच्याबरोबर स्टेजवरही होता. दरम्यान जेव्हा आरोपी स्टेजवर आला तेव्हा त्यानं बॅग उचलून फरार झाला. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला.