मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुवर्ण मंदिरातल्या घटनेची पुनरावृत्ती; कपूरथलामध्ये बेदम मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू

सुवर्ण मंदिरातल्या घटनेची पुनरावृत्ती; कपूरथलामध्ये बेदम मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू

पंजाबमधील (Punjab) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) झालेलं प्रकरण ताजं असताना दुसरी घटना घडली आहे. असंच एक प्रकरण कपूरथला (Kapurthala) येथून समोर आले आहे.

पंजाबमधील (Punjab) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) झालेलं प्रकरण ताजं असताना दुसरी घटना घडली आहे. असंच एक प्रकरण कपूरथला (Kapurthala) येथून समोर आले आहे.

पंजाबमधील (Punjab) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) झालेलं प्रकरण ताजं असताना दुसरी घटना घडली आहे. असंच एक प्रकरण कपूरथला (Kapurthala) येथून समोर आले आहे.

  • Published by:  Pooja Vichare

चंदीगड, 19 डिसेंबर: पंजाबमधील (Punjab) सुवर्ण मंदिरात (Golden Temple) झालेलं प्रकरण ताजं असताना दुसरी घटना घडली आहे. असंच एक प्रकरण कपूरथला (Kapurthala) येथून समोर आले आहे. असे सांगण्यात येत आहे की, निशान साहिबच्या अपमानाच्या आरोपीला जमावानं बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शनिवारी घडलेल्या घटनेनंतर, रविवारी कपूरथलाच्या निजामपूरमध्ये कथित अपवित्र प्रकरण उघडकीस आले. या घटनेतही मारहाणीनंतर आरोपीचा मृत्यू झाला आहे.

कपूरथला येथे रविवारी सकाळी आरोपीनं निशाण साहिब काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला. स्वयंसेवकांनी त्याला पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर कपूरथलामध्ये तणावाचं वातावरण आहे.

हेही वाचा-  तलाक...तलाक...तलाक...! 'या' क्षुल्लक कारणानं पतीनं मोडला 16 वर्षांचा सुखी संसार

कपूरथला गुरुद्वाराने केलेल्या घोषणेमध्ये पोलीस आणि कोणत्याही एजन्सीने यामध्ये हस्तक्षेप करू नये, असं म्हटलं आहे. पंजाब पोलीस आणि राज्य सरकार हे अपवित्र प्रकरणांना तितकेच जबाबदार आहेत. यासोबतच लोकांना मोठ्या संख्येनं जमा होण्यास सांगण्यात आलं आहे.

घटना काय आहे?

बाबा अमरजित सिंह यांनी सांगितलं की, पहाटे 4 वाजता एक व्यक्ती दरबार हॉलमध्ये आला. प्रवेशाच्या वेळी गुरुसाहिबमध्ये गुरु महाराजांचा प्रकाश नव्हता. आवाज केल्यावर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण स्वयंसेवकांनी त्याला पकडले. मात्र, हे प्रकरण सिलिंडर चोरीचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा- पाकिस्तान हादरलं; नाल्यात झालेल्या स्फोटात डझनभर लोकांचा मृत्यू, 12 जखमी

गुरुद्वारा साहिबजवळ पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यास विरोध करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या संख्येनं शीख संघटना घटनास्थळी पोहोचू लागल्या आहेत. SSP कपूरथला यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दिल्लीहून आल्याचा दावा, काही IDही सापडली

आरोपी तरुण दिल्लीहून आल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. चौकशीत तरुणाने सांगितले की, त्याला पैसे देऊन अपवित्र करण्यासाठी पाठवले होते. याशिवाय तो स्वत:बद्दल अधिक काही सांगू शकला नाही. त्याने त्याचे नावही सांगितले नाही. त्याच्याकडून काही आयडी कार्ड सापडली आहेत.

2 तासांच्या मेहनतीनंतर पकडला

पहाटे चारच्या सुमारास लोक नितनेम करण्यासाठी उठले. त्यावेळी हा तरुण निशान साहिबची विटंबना करत होता. ते आल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात आलं.

सुवर्ण मंदिरातील घटना

सुवर्ण मंदिरात (Golden Temple) शनिवारी एका तरुणाची हत्या (young man was killed) करण्यात आली. मूळच्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) या तरुणाने सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा (Guru Granth Sahib) अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ठेवलेले श्रीसाहेब (साबर) उचललं होतं. यानंतर लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- OMG..! महाराष्ट्रात एकच चर्चा, 'या' म्हशीला पाहण्यासाठी जमतेय लाखोंची गर्दी 

या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण चांगलेच तापलं आहे. संतप्त जमावाने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तरुणाचा मृतदेह दाखवा, मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, असे त्यांचं म्हणणं आहे. अमृतसरचे डीसीपी परमिंदर सिंह भंडल यांनी सांगितले की, तरुणाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

दर्शन लाईनमध्ये उभा होता तरुण

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून येत आहे की, हा तरुण दर्शन घेणाऱ्या लोकांमध्ये दिसत आहे. त्याच्यापुढे एक शीख तरुण उभा होता. नमस्कार करण्यासाठी खाली वाकल्यावर तो तरुण उठण्याची वाट पाहत शांतपणे उभा राहिला. त्यानंतर शीख तरुण उभा राहिला आणि बाहेर जाणाऱ्या दिशेनं जात असताना तेव्हा हा तरुण पुढे आला आणि तिथे बसवलेल्या ग्रीलजवळ पोहोचला. काही क्षण थांबल्यानंतर अचानक त्याने ग्रीलवरून उडी मारून आत उडी घेतली. त्यानं श्री गुरु ग्रंथसाहिब समोर ठेवलेली कृपाण उचलली. हा सर्व प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला.

First published:

Tags: Punjab