चिंताजनक! Coronavirus ची वर्तणूक बदलली? भारतात 15 दिवसांनी दिसली लक्षणं

चिंताजनक! Coronavirus ची वर्तणूक बदलली? भारतात 15 दिवसांनी दिसली लक्षणं

भारतात Coronavirus चं प्रमाण वाढत आहे आणि त्यातच एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. एरवी 3 ते 10 दिवसात लक्षणं दाखवणारा हा विषाणू आता 15 दिवसांनीही जिवंत असल्याचं दिसतंय. त्यामुळे भीती वाढली आहे.

  • Share this:

चंदिगड, 27 मार्च : कुठल्याही नव्या विषाणूचा मानवी शरीरात तग धरून संसर्ग पसरवण्याचा एक पॅटर्न असतो. या पॅटर्नला छेद देणारी केस भारतात सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

दुबईहून आल्यानंतर पंजाबमधल्या एका 22 वर्षीय तरुणाला घरातच विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्यामध्ये कुठलंही कोरोनाव्हायरसचं लक्षण दिसलं नाही, तरीही त्याने सरकारने दिलेला सल्ला मानून 14 दिवस स्वतःला घरात बंद केलं.

14 दिवसांच्या होम क्वारंटाइननंतर 15 व्या दिवशी त्याला ताप चढला. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली.

वाचा - असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

चंदिगडमधल्या तरुणाच्या या विचित्र केसमुळे देशभरातल्या सगळ्याच वैद्यकीय तज्ज्ञांचं आणि आरोग्य सेवकांचं धाबं दणाणलं आहे. होम क्वारंटाइन किंवा संशयित रुग्णांना केवळ 14 दिवसच अलग ठेवण्यात येतं. त्या दिवसात लक्षणं दिसली नाहीत तर कोरोनाव्हायरसची लागण झाली नसल्याचं गृहित धरलं जातं. आता चंदिगडच्या या केसमुळे मात्र वेगळाच धोका निर्माण झाला आहे.

चंदिगडची जबाबदारी असलेले IAS अधिकारी मनोज परिदा यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे.

परिदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 22 वर्षीय तरुणाच्या संपर्कातल्या सगळ्या व्यक्तींना पुन्हा क्वारंटाइन केलं आहे आणि त्यांची टेस्ट करण्यात येणार आहे.

ICMR च्या सल्ल्याप्रमाणे या विषाणूचा जिवंत किंवा अॅक्टिव्ह राहण्याचा कालावधी 14 दिवसांचा असतो. त्यामुळे आतापर्यंत सर्वांना 14 दिवसांचा क्वारंटाइनचा सल्ला दिला जात होता. 15 व्या दिवशी लक्षणं दिसलेला हा भारतातला पहिलाच रुग्ण असावा, असं चंदिगडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे संचालक बी. एस. चव्हाण यांनी सांगितलं.

कोरोनाव्हायरसचं वागणं बदललं असेल आणि लक्षणं दिलायला अशा उशीर लागत असेल तर भारतात क्वारंटाइनचे नियम आणि मुदत बदलायला लागणार आहे. त्यादृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे माहिती दिली असल्याचं चंदिगडमधून सांगण्यात आलं.

बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे 'या' देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

First published: March 27, 2020, 9:01 PM IST

ताज्या बातम्या