Home /News /national /

कॅब ड्रायवरने मागितले पैसे तर महिलेने फाडले स्वत:चे कपडे, स्टेशनवर हायवोल्टेज ड्रामा

कॅब ड्रायवरने मागितले पैसे तर महिलेने फाडले स्वत:चे कपडे, स्टेशनवर हायवोल्टेज ड्रामा

महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा! मीटरचे पैसे देण्याऐवजी फाडले कपडे

    चंदीगड, 09 मार्च : कॅब ड्रायवरने ऑनलाइन पैसे घेण्यास नकार दिल्यानं महिलेनं भर रेल्वे स्थानकात हाय वोल्टेज ड्रामा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ह्या महिलेनं कॅब ड्रायवरसोबत आधी वाद घातला आणि आपलं म्हणणं ऐकत नाही या रागात महिलेनं भर स्थानकात कपडे फाडून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चंदीगड रेल्वे स्थानकात हा संपूर्ण प्रकार घडला. ढाकौलीपासून रेल्वे स्थानकात येण्यासाठी कॅब चालकाचं बिल 328 रुपये झालं होतं. महिलेनं ते ऑनलाइन पे करण्याचं कबूल केलं. मात्र चालकाकडे ऑनलाइन अकाऊंट नसल्यानं त्यानं विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जात महिलेनं ड्रायवरला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही महिला रेल्वे स्थानकात पळून गेली. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या महिला कॉन्स्टेबलला या कॅब चालकानं गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगून त्या महिलेकडून पैसे घेण्याची विनंती केली. हे वाचा-12 वाजून 56 मिनिटांनी ठाणे लोकलमध्ये अचानक घुसले NSGचे जवान, वाचा नेमकं काय घडलं महिला कॉन्स्टेबलने कॅब चालकाचं म्हणणं ऐकून घेत त्याला तिथेच थांबण्यास सांगितलं आणि तिने महिला गाठलं. कुठली तक्रार नोंदवायची असेल तर पोलीस ठाण्यात नोंदवा असं त्यांनी सांगताच या महिलेनं पोलीस कॉन्स्टेबल असणाऱ्या महिलेलाही बोचकारलं. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या चेहऱ्यावर नखांचे वळ उठेपर्यंत या महिलेनं ड्रामा केला आणि कपडे फाडण्यास सुरुवात केली. संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलेच्या या हायव्होल्टेज ड्रामा शांत केला आणि पोलिसांनी अखेर पर्याय न उरल्यानं महिलेच्या गळ्याला पकडून नेलं. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्य़ात असून तिची चौकशी सुरू आहे. हे वाचा-राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, वरळी व लोअर परेल येथे CBI ची छापेमारी
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या