मुख्यमंत्र्यांशी पटत नाही, सिद्धूंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा!

मुख्यमंत्र्यांशी पटत नाही, सिद्धूंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा!

पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

चंदीगड, 14 जुलै: पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वाद टोकाला गेला होता. अखेर सिद्धू यांनी राजीनाम्याने या वादाचा शेवट झाला. सिद्धू यांनी ट्विटकरून राजीनामा दिल्याची माहिती दिली. आपण 10 जुलै रोजीच राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजीनामा दिल्यापासून राहुल गांधी यांच्या उत्तराची वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या अर्थी अद्याप उत्तर आले नाही त्याचा अर्थ राजीनामा मंजूर असल्याचे मी मानतो असे सिद्धूंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांच्यात वाद सुरु आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात अधिक जागा न मिळाल्याचे खापर मुख्यमंत्र्यांनी सिद्धूंवर फोडले होते. इतक नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 6 जून रोजी झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीस सिद्धू सह अनेक मंत्र्यांचे विभाग बदलण्यात आले होते. आधी सिद्धूंकडे स्थानीक स्वशासन विभाग होता. नंतर तो ऊर्जा आणि नव उर्जा मंत्रालय देण्यात आले. मंत्रिमंडळातील या बदलानंतर सिद्धू यांनी मंत्रालयाची सूत्रेच हाती घेतली नाहीत आणि कोणत्याही बैठकीस हजर झाले नाहीत.

दुसरीकडे सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी नाराज होऊन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सिद्धू यांनी दिल्ली भेटीत प्रियांका गांधी यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी ट्विटकरून सांगितले होते की, काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली. त्यांना पत्र दिले आणि परिस्थीतीची जाणीव करुन दिली. या ट्विटसोबत त्यांनी राहुल, प्रियांका आणि अहमद पटेल यांच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला होता.

VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!

First published: July 14, 2019, 1:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading