राम रहीमची बॅग उचलणाऱ्या सरकारी वकिलाची हकालपट्टी

राम रहीमची बॅग उचलणाऱ्या सरकारी वकिलाची हकालपट्टी

राम रहीमला पोलीस घेऊन जात असताना सरकारी वकील गुरदास सिंह फलवारा यांनी त्याची बॅग उचलली.

  • Share this:

26 आॅगस्ट : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. राम रहीमला पोलीस घेऊन जात असताना सरकारी वकील गुरदास सिंह फलवारा यांनी त्याची बॅग उचलली. त्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आलीये.

राम रहीमला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी गुरुदास सिंह फलवारा यांनी राम रहीमची एक बॅग उचलली होती. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर फलवारा यांची हकालपट्टी करण्यात आलीये.

राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या समर्थकांनी धुडगूस घालत जाळपोळ आणि तोडफोड केला. या हिंसाचारात 33 जणांचा मृत्यू झाला तर 250 जण जखमी झाले आहे.

First published: August 26, 2017, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading