सपना चौधरी यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

सपना चौधरी यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

शनिवारी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : हरियाणाची लोकप्रिय डान्सर सपना चौधरी यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सपना चौधरी यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांच्या निवासस्थानी काँग्रेसची सदस्यता स्वीकारली आहे. यावेळी काँग्रेस कमिटीचे प्रदेश समन्वयकमंत्री नरेंद्र राठी उपस्थित होते.

सपना चौधरी या मथुरेमधून लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. 'हरियाणा की शान' सपना चौधरीच्या डान्सचा जलवा सुरू झाल्यावर पब्लिक बेफाम होते. सपना चौधरीची लोकप्रियता देशभरात पसरली आहे. यू ट्यूबवर सपना यांच्या गाण्यांना लाखांच्या हिट्स आहेत. बिग बॉसमध्येही सपना सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता काँग्रेसही घेतला आहे.

मथुरा लोकसभा मतदारसंघात जाट मतदारांची संख्या जास्त आहे. मथुरा लोकसभा मतदारसंघातून 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर हेमा मालिनी निवडून आल्या होत्या. आता या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे.

जाट मतदारांची संख्या जास्त असल्यानं आणि सपना चौधरी यासुद्धा जाट असल्यानं त्यांना तिकीट दिलं जाणार अशी चर्चा आहे. सपना चौधरी मागील वर्षी सोनिया गांधींच्या भेटीची वेळ मिळावी यासाठी काँग्रेस  कार्यालयात पोहोचल्या होत्या. त्यावेळीच सपना चौधरी आणि काँग्रेसच्या कनेक्शनची चर्चा सुरू झाली होती.

हेमा मालिनी यांना बॉलिवूडची ड्रीम गर्ल असं म्हटलं जातं. आता या ड्रीम गर्लला लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचं स्वप्न काँग्रेसनं पाहिलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपना चौधरी मैदानात उतरवलं आहे. भाजपला पराभूत करण्याचं काँग्रेसचं ड्रीम सपना चौधरी पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

VIDEO : कांचन कुल यांच्या उमेदवारीवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

First published: March 23, 2019, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading