पंजाबमधल्या जेलमध्ये कैद्यांचं बंड, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार

पंजाबमधल्या जेलमध्ये कैद्यांचं बंड, पोलिसांच्या गोळीबारात एक ठार

फरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली असून या कैद्यांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

लुधीयाना 27 जून : पंजाबमधल्या लुधियानातल्या सेंट्रल जेलमध्ये कैदी आणि पोलिसांमध्ये आज जोरदार धुमश्चक्री झाली. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करताच इतर कैद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या चकमकीत एक कैदी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.

जेलमध्ये कैदी आणि पोलिसांचं सकाळी भांडण झालं. त्याची तीव्रता एवढी वाढली की कैद्यांनी पोलिसांची एक गाडीही जाळली. हे भांडण सुरू असतानाच 9 कैदी जेलची भींत ओलांडून पळून गेले. पोलिसांनी या कैद्यांचा पाठलाग केला आणि त्यातल्या चार कैद्यांना पुन्हा पकडलं. तर इतर पाच कैद्यांचा शोध सुरू आहे. फरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली असून या कैद्यांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशात गुंडांचं फोटोसेशन

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पोलिसांना पूर्ण मोकळीक दिलीय. त्यामुळे चकमकींमध्ये ठार होणाऱ्या गुंडांचं प्रमाण वाढलंय. या धडक कारवाईचा गुंडांच्या टोळ्यांना धाकही निर्माण झालाय. हे खरं असलं तरी जेलमध्ये असलेल्या गुंडांच्या फोटोंनी खळबळ निर्माण केलीय. जेलमध्ये हातात पिस्तुलं घेऊन काही गुंडांनी फोटो काढलेत. हे फोटो आता व्हायरल झाले असून जेलच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. राज्य सरकारनेही या फोटोंची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातल्या उन्नव जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले कुख्यात गुंड अंकुर आणि अमरेश यांचे हातात पिस्तुल घेतलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या गुंडांना जेलमध्ये सर्व सोई-सुविधा मिळत असल्याचंही बोललं जातं. हे गुंड जेलमध्ये पार्ट्या करता अशीही माहिती आता बाहेर आली आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. उत्तर प्रदेशात गुन्हेगारी टोळ्यांचं चांगलच वर्चस्व आहे. राजकारण्यांशी या टोळ्या संबंधीत असल्याने त्यांना हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही असंही बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या