गुरमीत राम रहीमला मिळू शकतो पॅरोल - सूत्र

गुरमीत राम रहीमला मिळू शकतो पॅरोल - सूत्र

साध्वी लैंगिक शोषण प्रकरणातील दोषी सिरसा डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जून : साध्वी लैंगिक शोषण प्रकरणातील दोषी सिरसा डेरा प्रमुख राम रहीमला पॅरोल मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राम रहीमनं पॅरोलसाठी अर्ज केला आहे. रहीमच्या पॅरोलसंदर्भात कारागृह मंत्री कृष्ण पवार यांनी सांगितले की, 'कारागृहात राम रहीमचं वर्तन चांगलं आहे. तसा अहवाल पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. पण आता कोणत्या कैद्याला पॅरोल द्यायचा की नाही? याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस आयुक्तच घेतात. '

(पाहा :'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या?नांगरे पाटलांचा खुलासा)

रहीमच्या पॅरोलसंदर्भात काय म्हणाले अनिल विज?

राम रहीमच्या पॅरोलसंदर्भात कॅबिनेट मंत्री अनिल विज म्हणाले की, डेरा प्रमुख रहीमला पॅरोल मिळणं हा त्याचा अधिकारी आहे. जर नियमात ही बाब बसत असेल तर त्यांना पॅरोल मिळेल. कायद्यामध्ये पॅरोलची तरतूद आहे. फाशी शिक्षा देण्यात आलेल्या दोषीला देखील पॅरोल मिळू शकतो. सरकार कायद्यानुसार चालतं आणि कायदा जे काही सांगेल सरकार तसंच करेल. त्यामुळे याद्वारे रहीमला काही विशेष सवलत दिली जाणार नाही.

(पाहा :VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही? अजित पवारांची तुफान फटकेबाजी)

पॅरोलसाठी राम रहीमचा अर्ज

डेरा प्रमुख राम रहीमनं यावेळेस पोलिसांकडे पॅरोलसाठी अर्ज केला. आपल्या डेऱ्यामध्ये शेती करण्याची इच्छा त्यानं अर्जामध्ये व्यक्त केली आहे. मात्र कारागृहातून बाहेर पडण्याची परवानगी मिळणं रहीमसाठी सोपी गोष्ट नाही. दरम्यान,  पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणातही स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम दोषी ठरवण्यात आलं आहे. याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

First published: June 24, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading