नकली paytm अॅपने या बहीण-भावांनी लाखोंना लावला चुना, असे सापडले तावडीत

मंडळी आता तुम्हाला विश्वास नाही होणार पण ही बहीण तनप्रीत कौर ही अशिक्षित आहे आणि तिचा भाऊ जश्नप्रीत हा 12वी पास आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2018 10:40 PM IST

नकली paytm अॅपने या बहीण-भावांनी लाखोंना लावला चुना, असे सापडले तावडीत

डेराबस्सीमध्ये अगदी हुबेहूब paytm सारखा नकली अॅप बनवून लाखो लोकांना चुना लावणाऱ्या भाऊ आणि बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीमध्ये राहणारा जश्नप्रीत आणि त्याची बहीण तरनप्रीत कौर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही एका मेडिकल स्टोरच्या दुकानामध्ये लोकांची फसवणूक करून तिथून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते.

दुकानदारांनी यांचा फोन जप्त केला आणि त्यांना पळून जाण्यापासून रोखलं. तोपर्यंत त्याने पोलिसांनी फोन करून बोलवून घेतलं आणि त्या दोघांना अटक केली. पोलिसांनी या बहीण-भावाच्या विरोधात कलम 420 आणि 66 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे बहीण-भाऊ गेल्या काही दिवसांआधी दुकानावर आले आहेत आणि त्यांनी 1964 रुपयांचं सामान खरेदी करून पेटीएमने पैसे देतो असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये दाखवलं तेव्हा पेमेंट झालं होतं. या दोघांनीही त्यांच्या मोबाईलमध्ये नकली पेटीएम अॅप डाऊनलोड केलं होतं.

या अॅपला ओपन केल्यानंतर अगदी खऱ्या पेटीएम अॅपसारखे ऑप्शन येतात आणि पेमेंट झालं आहे असं दाखवलं जातं. पण खरं तर पेमेंट झालेलं नसतं.

मंडळी आता तुम्हाला विश्वास नाही होणार पण ही बहीण तनप्रीत कौर ही अशिक्षित आहे आणि तिचा भाऊ जश्नप्रीत हा 12वी पास आहे. पण तरी देखील या दोघांनी इतका मोठा फ्रॉड केला. तर या खोट्या अॅपला आता प्ले-स्टोअरवरून काढून टाकण्यात आलं आहे. पण तरीही कोणतंही अॅप डाऊनलोड करण्याआधी त्याची वैध्यता तपासून घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2018 10:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...