Home /News /national /

Baroda By-Election: कुस्तीपटू योगेश्वर दत्तला काँग्रेसकडून 'धोबीपछाड'? भाजपचा हा उमेदवार पिछाडीवर

Baroda By-Election: कुस्तीपटू योगेश्वर दत्तला काँग्रेसकडून 'धोबीपछाड'? भाजपचा हा उमेदवार पिछाडीवर

हरियाणामधील बरोडा विधानसभा सीटसाठी (Baroda By-Election) झालेल्या पोट निवडणुकीची देखील मतमोजणी सुरू आहे.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: बिहार निवडणुकांबरोबरच देशभरात विविध ठिकाणी काही पोटनिवडणुकांचे निकाल देखील लागत आहेत.  हरियाणामधील बरोडा विधानसभा सीटसाठी (Baroda By-Election) झालेल्या पोट निवडणुकीची देखील मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. या जागेवर कॉंग्रेस 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. तर भाजपचे योगेश्वर (Yogeshwar Dutt) दत्त मागे पडले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार इंदुराज आघाडीवर आहेत. विसाव्या फेरीनंतर ते प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश्वर दत्तपेक्षा बरेच पुढे आहेत. कॉंग्रेसच्या उमेदवाराला विसाव्या फेरीपर्यंत 60,132 मते मिळाली आहेत, भाजपच्या योगेश्वर दत्त यांना 50,176, तर INLD उमेदवाराला 4980 मते मिळाली आहेत. त्याचवेळी एलएसपीच्याा राजकुमार सैनी यांना 5595 मते मिळाली. अशा परिस्थितीत कॉंग्रेस 8191 च्या पुढे आहे. योगेश्वर दत्तनी आघाडी घेतल्यानंतर आता पुन्हा पिछाडीवर दुसर्‍या फेरीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश्वर दत्त यांनी आघाडी घेतली होती. दुसर्‍या फेरीत त्यांना 3086 मते मिळाली, तर कॉंग्रेसचे उमेदवार इंदुराज यांना 2727 मते मिळाली. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराने मुसंडी मारली. यावेळी 6 नंबरच्या बुथवरील मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. काही वेळातच त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. (हे वाचा-CM पदाचे दावेदार तेजस्वी 9वी,तेज प्रताप 12वी पास; लालूंच्या 7 कन्या उच्चशिक्षित) (हे वाचा-शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा ते शरद यादव यांची मुलगी, या आहेत 'हाय व्होल्टेज' लढती) बरोडाच्या पोटनिवडणुकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने मोहाना गावातल्या बिट्स कॉलेजमध्ये उभारलेल्या मतमोजणी केंद्रावर मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. याठिकाणी 14 टेबलांवर 20 फेऱ्यांमध्ये मोजणी केली जात आहे.  बरोडा पोटनिवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीने कुस्तीपटू योगेश्वर दत्तला उमेदवारी दिली आहे.  तर कॉंग्रेसचे इंदुराज नरवाल, इनेलोचे जोगेंद्र मलिक, लोसुपाचे राजकुमार सैनी यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Election

    पुढील बातम्या