प्रेमात स्व:तालाच दिली शिक्षा! प्रेयसीने नंबर ब्लॉक केला म्हणून तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

प्रेमात स्व:तालाच दिली शिक्षा! प्रेयसीने नंबर ब्लॉक केला म्हणून तरुणानं उचललं धक्कादायक पाऊल

  • Share this:

चंदीगड, 03 जुलै : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील प्रसिद्ध मेणबत्ती व्यावसायिकाच्या मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन संपवले. मुख्य म्हणजे परदेशात राहणाऱ्या एका मुलीशी या घटनेचा संबंध आहे. परदेशात गेल्यानंतर या मुलीनं मृत सलीलचा फोन नंबर ब्लॉक केला होता, त्यामुळे सलील नैराश्येत होता, यातूनच त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चरणजित पुरी येथे राहणारे मेणबत्ती व्यापारी राजेश महेंद्रू यांचा मुलगा सलील याने आत्महत्या केली आणि कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला. 24 वर्षीय सलीलने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सलीलच्या आत्महत्येमागील कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारी एक मुलगी. सलील आणि या मुलीची 8 महिन्यांपासून मैत्री होती. या दोघांचे लग्नही झाल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

वाचा-दीपिका पदुकोनने शेअर केला मनाला भिडणारा VIDEO; म्हणते #DobaraPoocho

फोन नंबर ब्लॉक केला म्हणून होता नैराश्येत

मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर काही दिवसांनी या मुलीनं सलील आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर सलील चिंतेत आणि नैराश्येत होता. याबद्दल सलिल खूप अस्वस्थही झाला होता. शेवटी त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांना या दोघांच्या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर सलीलला धमकावण्यास सुरूवात झाली.

वाचा-सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींची शुक्रवारी होणार चौकशी

पोलिसांनी केली चौकशीला सुरुवात

पोलीस अधिकारी भगतवीर सिंह या प्रकरणाची चौकशी करत आहेत. भगतवीर सिंह यांनी सांगितले की, सलीलचे वडील राजेश महेंद्रू यांनी असे निवेदन दिले आहे की मुलगा सलीलने या मुलीशी 8 महिन्यांपूर्वी कसबा नकोदरमधील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. या लग्नात मुलाची आई आणि मुलीच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा मुलीच्या वडिलांना या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्याने सलीलला धमकवण्यास सुरूवात केली आणि सलीलचा फोन नंबर ब्लॉक केला. ही मुलगी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाला गेली आणि सध्या तिथेच आहे.

वाचा-अन् गृहमंत्र्यांनी उदयनराजे भोसले यांना केला मुजरा, या गाण्यासह VIDEO व्हायरल

संकलन-प्रियांका गावडे.

First published: July 3, 2020, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading