S M L

Chanakya Exit Polls 2019 : चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये 'अब की बार NDA 300 पार'

भाजप स्वबळावर बहुमताचा जादुई आकडादेखील पार करेल,अशीही शक्यता वर्तवली गेली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 19, 2019 10:05 PM IST

Chanakya Exit Polls 2019 : चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये 'अब की बार NDA 300 पार'

नवी दिल्ली ,19 मे : लोकसभा निवडणूक 2019 मधील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता एक्झिट पोलची उत्सुकता लागली होती. यंदाच्या निवडणुकीत जनतेनं कौल कोणाला दिला आहे, याचा अंदाज एक्झिट पोलद्वारे घेण्यात येत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच भाजप स्वबळावर बहुमताचा जादुई आकडादेखील पार करेल,अशीही शक्यता वर्तवली गेली आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार NDA 350 जागा तर एकट्या भाजपला 300 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर UPAला95 जागा आणि काँग्रेसला 55 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 2019 लोकसभा निवडणुकीतीही 'फिर एक बार मोदी सरकार' येणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.



वाचा :'फिर एक बार मोदी सरकार', 'News18'च्या पोलमध्ये 'NDA'ला स्पष्ट बहुमताचा कौल

'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार आलेले अंदाज

पक्ष                     जागा (542)                       टक्केवारी

NDA                                  336                 48.5 टक्के

भाजप                 276                                  39.6 टक्के

घटकपक्ष             60                                       8.9 टक्के

UPA                                   82                   25.0 टक्के

काँग्रेस                 46                                    18.8 टक्के

आघाडी               36                                    6.2 टक्के

अन्य                                   124                   26.5 टक्के

टीएमसी             38                                     4.5 टक्के

सपा                    10                                    2.1 टक्के

बसपा                  7                                      2.5 टक्के

टीआरएस            12                                    1.6 टक्के

बीजेडी                13                                    2.0 टक्के

YSRCP              13                                     1.9 टक्के

डावे                     12                                    2.6 टक्के

आप                       1                                    0.2 टक्के

टीडीपी                11                                    1.9 टक्के

अन्य                     7                                     7.2 टक्के


वाचा :EXIT POLL 2019 : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला धक्का, राज्यात पुन्हा कमळच फुलणार

'नेटवर्क 18'च्या एक्झिट पोलनुसार, देशात 'फिर एक बार मोदी सरकार' येणार असल्याचं चित्र दिसत आहे. यंदाही मोदी लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक 2014  जागा 543

पक्ष              जागा         टक्केवारी

भाजप          282        31.04 टक्के

काँग्रेस          44         19.27 टक्के

एडीएमके     37         3.27 टक्के

टीएमसी       34         3.85 टक्के

बीजेडी        20          1.72 टक्के

शिवसेना      18          1.86 टक्के

टीडीपी        16          2.49 टक्के

अन्य            92         36.26 टक्के

लोकसभा निवडणूक 2014 : मोदी लाट

2014मध्ये देशात नऊ टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचे निकाल 16 मे 2014 रोजी लागले होते. 2014च्या निवडणुकीत एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. पण सध्याची भाजपची सदस्य संख्या 268 एवढी आहे.

पाहा :EXIT POLL VIDEO : शरद पवारांची चिंता खरी ठरणार, अजितदादांना बसू शकतो धक्का

बहुमताचा जादुई आकडा 272

कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 जागा आवश्यक असतात. जर बहुमतासाठी काही जागा कमी पडत असतील तर मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येऊ शकते. राजकीय पक्ष निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू शकतात.

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळतं?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा जिंकणं आवश्यक असतं. किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेते पद मिळवता येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागांवर विजय मिळवता आला होता.

वाचा :EXIT POLL 2019 : लोकसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोल्सचे निकाल एका क्लिकवर

लोकसभा निवडणूक 2019 : 7 टप्प्यात पार पडलं मतदान

पहिला टप्पा : 20 राज्यांतील 91 मतदारसंघ

दुसरा टप्पा : 14 राज्यांतील 97 मतदारसंघ

तिसरा टप्पा : 14 राज्यातील 115 मतदारसंघ

चौथा टप्पा : 9 राज्यातील 71 मतदारसंघ

पाचवा टप्पा : 7 राज्यांत 51 मतदारसंघ

सहावा टप्पा : 7 राज्यातील 59 मतदारसंघ

सातवा टप्पा :  8 राज्यातील 59 मतदासंघ

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदिगडमध्ये एकाच टप्प्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली.

तर महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

वाचा :Exit Poll 2019 : राजस्थानमध्ये कर्नाटक पॅटर्न; काँग्रेसला दाखवला ‘हात’

VVPAT यंत्रांची सुविधा

विशेष म्हणजे यंदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मतदारांना मोबाइल, बॅग्स अन्य कोणते सामनाही केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.



News 18-IPSOS Exit Pollचे अचूक अंदाज

लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि  IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आली. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आला. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.

या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दीड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही विशेष काळजी घेण्यात आली. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत, अशा विविध मतदारसंघांची निवड करण्यात आली.

त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजीही घेण्यात आली.

SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2019 10:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close