इम्रान खान यांचा काश्मीरसाठी अट्टाहास पण काय आहे पाकसमोरची खरी समस्या?

इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण तोही पुरता फसला. काश्मीरच्या प्रश्नापेक्षाही आत्ता पाकिस्तानसमोर आर्थिक संकटाचं आव्हान आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2019 05:05 PM IST

इम्रान खान यांचा काश्मीरसाठी अट्टाहास पण काय आहे पाकसमोरची खरी समस्या?

मुंबई, 5 ऑक्टोबर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिरर्दीबद्दल चर्चा होते आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात पाकिस्तानचं नाव मोठं केलं पण आता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून मात्र त्यांना अनेक आघाड्यांवर अपयश आलं आहे.

पाकिस्तान कर्जाच्या खाईत बुडालेला असताना त्यांच्यासमोर आर्थिक आव्हानं मोठी आहेत. याआधी इम्रान खानी यांनी पाकिस्तान हे भ्रष्टाचारमुक्त कल्याणकारी राज्य बनवण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत.

इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पण तोही पुरता फसला. काश्मीरच्या प्रश्नापेक्षाही आत्ता पाकिस्तानसमोर आर्थिक संकटाचं आव्हान आहे.

आर्थिक प्रगतीचा दर घटला

2018 च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या आर्थिक प्रगतीचा दर 5.5 टक्के होता. त्यामध्ये 2019 मध्ये घट झाली आणि तो 3.3 टक्क्यांवर आला. आता तो आणखीही घटण्याचा धोका आहे.

Loading...

रुपया कमकुवत

डॉलरच्या तुलनेत पकिस्तानी रुपया 35 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

महागाई

महागाईबद्दल बोलायचं झालं तर पुढच्या वर्षभरात महागाईचा दर 13 टक्क्यांवर जाईल. असं झालं तर तो 10 वर्षांतला उच्चांकी दर असेल.

खजिना झाला रिकामा

पाकिस्तानच्या खजिन्यातही मोठी घट झाली आहे. 2020 मध्ये ही घट आणखी वाढणार आहे.

पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मोठं कर्ज आहे. या कर्जाच्या दुप्पट कर्ज चीनचं आहे.

आकडेवारीवर नजर टाकली तर पाकिस्तानमध्ये 1 टक्केच लोक कर भरतात.

इम्रान खान यांनी सत्तेत आल्यानंतर कराची चोरी करण्याचं आश्वासन दिलं होतं पण हे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही.

=================================================================================================

VIDEO : 'या' कारणामुळे राज ठाकरेंच्या ताफ्यात घडला अपघात, तुम्हीही घ्या खबरदारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...