अमित शहांची जागा घेणाऱ्या जे.पी. नड्डा यांच्यासमोर आहेत ही 5 मोठी आव्हाने

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे.

  • Share this:

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची अखेर पक्षाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. नड्डा यांच्यासमोर आता काही मोठी आव्हानं देखील असणार आहेत.

दिल्ली विधानसभा : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. दिल्लीत भाजपसमोर अरविंद केजरीवाल यांच्या रुपाने मोठं आव्हान आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना धक्का देत सत्ता काबीज करण्याचा चमत्कार जे.पी.नड्डा करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिहार विधानसभा : बिहारमध्ये मागील निवडणुकीत भाजपला नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या युतीमुळे पराभव स्वीकारावा लागला. मात्र काही काळातच नितीश कुमार हे पुन्हा एनडीएत सामील झाले. त्यामुळे बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला अच्छे दिन आणण्यासाठी जे.पी. नड्डा यांना नितीश कुमार यांच्यासोबत चांगला समन्वय ठेवावा लागणार आहे.

ममता बॅनर्जींना शह देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालचं मैदान जिंकण्यासाठी मोठी ताकद लावली होती. निवडणुकीत भाजपने चांगली मुसंडीही मारली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करत बंगालमध्ये भाजपचा झेंडा रोवण्याचं आव्हान नड्डा यांच्यासमोर असणार आहे.

अमित शहांची जागा घेणं : भाजपचे मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात पक्षाने अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवलं. तसंच काही ठिकाणी विपरीत परिस्थिती असताना अमित शहा पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन गेले आहेत. त्यामुळे अमित शहा यांची जागा घेण्याचं खडतर आव्हान नड्डा यांच्यासमोर असणार आहे.

पक्षाची प्रतिमा उंचावणं : सत्ताधारी पक्षाकडून लोकांना नेहमीच मोठ्या अपक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण न झाल्यास सत्ताधाऱ्यांना लोकांचा रोष सहन करावा लागता. सलग दुसऱ्यांदा भाजपला केंद्रात सत्ता मिळाली आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा कायम चांगली राहावी, यासाठी जे.पी. नड्डा यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 20, 2020 03:44 PM IST

ताज्या बातम्या