मराठी बातम्या /बातम्या /देश /आजोबांचा नादचखुळा 63 व्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत ट्रेकींगमध्ये केला नवा विक्रम

आजोबांचा नादचखुळा 63 व्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत ट्रेकींगमध्ये केला नवा विक्रम

वयाच्या 63व्या वर्षी उणे 40 अंश तापमानात यशस्वीपणे पूर्ण केला चादर ट्रेक; गुजराती व्यक्तीची कामगिरी

वयाच्या 63व्या वर्षी उणे 40 अंश तापमानात यशस्वीपणे पूर्ण केला चादर ट्रेक; गुजराती व्यक्तीची कामगिरी

63 वर्षांच्या एका व्यक्तीने उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात हाडं गोठवणाऱ्या थंडीत चादर ट्रेक पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Gujarat, India

  वलसाड, 31 जानेवारी : 63 वर्षांच्या एका व्यक्तीने उणे 40 अंश सेल्सिअस तापमानात हाडं गोठवणाऱ्या थंडीत चादर ट्रेक पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम केला आहे. चादर ट्रेक हा देशातला सर्वांत कठीण ट्रेक म्हणून ओळखला जातो. हा सर्वोच्च उंचीवरील ट्रेक असून, हा अत्यंत अवघड ट्रेक पूर्ण करणारे कांतिभाई पटेल हे सर्वांत वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी त्यांनी हा ट्रेक पूर्ण केला आहे. कांतिभाईंनी कैलास मानसरोवर यात्रादेखील पाच वेळा पूर्ण केली आहे.त्यामुळे ते आता पंचकैलाशी बनले आहेत. ही यात्रा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते.

  कांतिभाई पटेल हे गुजरातमधल्या वापी इथले रहिवासी असून, ते एकटे राहतात. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एका फार्मा कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी स्वीकारली. त्यांच्या पत्नीचं 2014मध्ये निधन झाले आहे. कांतिभाई निवृत्तीनंतरही सक्रिय आहेत. त्यांना ट्रेकिंगची खूप आवड आहे. त्यांनी नुकताच देशातला सर्वांत कठीण मानला जाणारा लेहमधला चादर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला. `अशी कामगिरी करणारा मी पहिलाच सर्वांत ज्येष्ठ गुजराती नागरिक आहे,` असा दावा कांतिभाईंनी केला आहे.

  हे ही वाचा : राहुल गांधी यात्रेत नक्की किती चालले? एवढं सामान्य व्यक्ती चालली तर काय होईल?

  हा चादर ट्रेक लेहमध्ये असून, तो 11,500 फूट उंचीवर आहे. या भागातील नद्या हिवाळ्यात गोठून जातात. त्यामुळे बर्फाच्या चादरीने संपूर्ण नदी व्यापल्यासारखं चित्र दिसतं. ट्रेकर्सना या बर्फाच्छादित नदीवरून चालावं लागतं. हा प्रवास अत्यंत धोकादायक मानला जातो. या वर्षी तिथलं तापमान उणे 20 ते 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते; पण कांतिभाईंनी त्याची तमा बाळगली नाही. त्यांनी त्यांच्या टीममधल्या इतर 15 सदस्यांसह हा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला. विशेष म्हणजे या टीममधले अन्य सर्व सदस्य कांतिभाईंपेक्षा वयाने लहान होते.

  पत्नीच्या निधनानंतर कांतिभाईंनी त्यांच्या दोन मुलींचं संगोपन केलं. त्यांची एक मुलगी बेंगळुरूत आयटी इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे, तर दुसरी पुण्यात आहे. एकटे असूनही कांतिभाई अतिशय व्यग्र जीवन जगत आहेत. त्यांना ट्रेकिंगची विशेष आवड आहे आणि सायकलिंगमध्येही त्यांनी काही विक्रम केले आहेत.

  हे ही वाचा  : जगातील असा एकमात्र देश ज्याची सीमा 14 देशांशी जोडलीय, तुम्हाला माहितीय त्याचं नाव?

  गेल्या तीन वर्षांत त्यांनी 55,000 किलोमीटरहून अधिक अंतर सायकलवरून कापलं आहे. त्यांनी अनेक शिखरंही सर केली आहेत. ते रोज 30 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर सायकल चालवतात. देशातल्या जवळपास सर्वच शहरांमधून त्यांनी सायकलवरून प्रवास केला आहे. लेह, माउंट आबू, कैलास मानसरोवर आणि मनाली यांसारख्या उंचावरच्या ठिकाणीही त्यांनी सायकलवरून प्रवास केला आहे.

  First published:

  Tags: Gujrat