Home /News /national /

‘संजीवनी- अ शॉट ऑफ लाईफ’ : वेगवान लसीकरणामुळे अर्थव्यवस्था रुळावर येईल : फेडरल बँकेचे CEO श्याम श्रीनिवासन

‘संजीवनी- अ शॉट ऑफ लाईफ’ : वेगवान लसीकरणामुळे अर्थव्यवस्था रुळावर येईल : फेडरल बँकेचे CEO श्याम श्रीनिवासन

फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन यांनी अटारी सीमेवर जागतिक आरोग्य दिनाच्या मुहूर्तावर Sanjeevani-A Shot of Life उपक्रमाचा आरंभ केला.

    अटारी सीमा (अमृतसर), 7 एप्रिल : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वानी लसीकरण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज, भीती आहे. हे लक्षात घेऊन नेटवर्क 18 (Network 18) आणि फेडरल बँक(Federal Bank) यांनी संयुक्तपणे लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याकरता त्यांनी ‘संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ’ (Sanjeevani-A Shot of Life) हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे (World Health Day) औचित्य साधून आज पंजाबमधील ऐतिहासिक अटारी सीमेवर (Attari Border) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ‘बीएसएफ’ (BSF) अर्थात सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना, बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि फेडरल बँकेचे (Federal Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन (Shyam Srinivasan) उपस्थित होते. लसीकरण वेगानं झाल्यास स्थिती पूर्वपदावर : श्रीनिवासन या वेळी फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन यांनी या उपक्रमातील सहभागाबद्दल नेटवर्क 18चे आभार मानले. लसीकरण मोहीम जलद गतीनं राबवल्यास आपली अर्थव्यवस्थाही लवकरात लवकर रुळावर येईल. फक्त 45 वर्षांवरील नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाची सुविधा सुरू करण्याची गरज आहे. जितक्या जास्त संख्येनं लसीकरण होईल, तितकी भीती कमी होईल. आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे जलदीनं लसीकरण झाल्यास स्थिती सुधारेल, असं श्याम श्रीनिवासन यांनी सांगितलं. ‘मागचं वर्ष अतिशय वाईट गेलं; पण आता येणारा काळ निश्चितच चांगला असेल, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी ‘सीएनएन-न्यूज 18’वरील (CNN-News 18) एका कार्यक्रमात पॉलिटिकल एडीटर मारिया शकील यांच्याशी साधलेल्या संवादात, नेटवर्क 18 आणि फेडरल बँक यांनी सुरू केलेल्या संयुक्त उपक्रमाचे नाव ‘संजीवनी : अ शॉट ऑफ लाईफ’ ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही लस खरच संजीवनी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं की, मी 2 मार्च रोजी जेव्हा लसीचा पहिला डोस घेतला तेव्हा म्हटलं होतं की, भगवान हनुमान यांना हिंदुस्थान पार करून संजीवनी आणायला जावं लागलं होतं; पण आता आम्ही तुमच्या घराजवळ, सरकारी आणि खासगी रुग्णालयात अनेक ठिकाणी ही संजीवनी उपलब्ध करून दिली आहे. ही लस रुपी संजीवनी तुम्हाला कोरोनासारख्या आजाराशी लढण्याची अभूतपूर्व शक्ती देते.’ लसीकरण ही आता लोकचळवळ होण्याची गरज असून, सर्वांनी ही लस घेण्यासाठी पुढं आलं पाहिजे असंही डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.
    First published:

    Tags: Corona vaccine, Sanjeevani

    पुढील बातम्या