'भीम'अॅप वापरणाऱ्यांसाठी खूष खबर, उद्यापासून 'कॅशबॅक'ची खैरात!

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 04:57 PM IST

'भीम'अॅप वापरणाऱ्यांसाठी खूष खबर, उद्यापासून 'कॅशबॅक'ची खैरात!

मुंबई,ता.13 एप्रिल : डिजिटल ट्रॅन्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार उद्यापासून 'भीम'अॅप धारकांवर 'कॅशबॅक'ची खैरात करणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून हा उपक्रम सुरू करणार असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलंय. आता 'भीम'अॅप धारकांसाठीही इतर अॅप सारख्याच कॅशबॅकच्या या ऑफर आहेत.

कशी आहे योजना?

सुरूवातीला 100 रूपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारावर 51 रूपयांचं कॅशबॅक मिळणार आहे.

त्यानंतरच्या 20 युनिक ट्रॅन्झॅक्शनवर प्रत्येकी 25 रूपये कॅशबॅक मिळतील.

त्यानंतरच्या 25 ते 50 ट्रॅन्झॅक्शन्सवर फिक्स 100 रूपये मिळतील

Loading...

50 ते 100 ट्रॅन्झॅक्शन्सवर फिक्स 200 रूपये मिळतील.

एकून 10 ट्रॅन्झॅक्शन्सवर 200 रूपये मिळतील.

100 पेक्षा जास्त ट्रॅन्झॅक्शन्सवर 250 रूपये मिळतील

व्यापाऱ्यांसाठी काय?

2000 रूपयांच्या ट्रॅन्झॅक्शन्सवर 2 ते 50 रूपयांपर्यंत इन्सेंटीव्ह

भीमअॅपच्या माध्यमातून एकावेळी 10 हजार रूपयांपर्यंत व्यवहार करता येतात.

तर एका दिवसामध्ये 20 हजारापर्यंत व्यवहार करता येतो.

त्यानंतर जास्त रकमेचे व्यवहार करायचे असतील तर क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करावा लागेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...