केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सरकार देणार 25 लाखांपर्यंत कर्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर, सरकार देणार 25 लाखांपर्यंत कर्ज

खरेदी करण्यासाठी ८.५० टक्के व्याजदराने २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

  • Share this:

10 नोव्हेंबर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता नवीन घर बांधणे किंवा खरेदी करण्यासाठी ८.५० टक्के व्याजदराने २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे गृहकर्ज मिळण्याची मर्यादा फक्त साडेसात लाख रुपये होती. तर व्याजाचा दर ६ ते ९.५० टक्क्यांपर्यंत कमी अधिक असायचा. २० वर्षांसाठी २५ लाख रुपये कर्ज देणाऱ्या अन्य वित्त कंपन्या अथवा खासगी बँकांच्या तुलनेत गृहनिर्माण अग्रिम योजनेचा लाभ घेऊन सुमारे ११ लाख रुपयांची बचत करू शकतात.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण अग्रिम योजनेच्या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं स्वस्त व्याज दराचं कर्ज मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 11:38 PM IST

ताज्या बातम्या