'कोरोना'साठी केंद्राचा असाही प्लॅन, युपीतील सर्वाधिक तर राज्यातील फक्त 5 जिल्हे!

'कोरोना'साठी केंद्राचा असाही प्लॅन, युपीतील सर्वाधिक तर राज्यातील फक्त 5 जिल्हे!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (एनआयव्ही) एक किट विकसित केली आहे. जी प्रथम भारतीय अँटीबॉडी किट आहे.

  • Share this:

 नवी दिल्ली, 13 मे : कोरोना विषाणूचा समुदाय संसर्ग रोखण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमण रोखण्यासाठी 21 राज्यांमधील 69 जिल्हे निवडली गेली असून त्यापैकी सर्वात जास्त जिल्हे हे उत्तर प्रदेशमधील आहेत. तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, 21 राज्यांमध्ये उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, बिहार, आसाम आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र्रातून ज्या जिल्ह्यात चाचणी होणार आहे त्यामध्ये बीड, नांदेड, परभणी , जळगाव, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. तर उतर प्रदेशातील अमरोहा, सहारनपूर, गौतम बुध नगर, बरेली, बलरामपूर, मऊ, औरैया, गोंडा आणि उन्नाव जिल्ह्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दिल्लीच्या कोणत्याही जिल्ह्याची निगराणीसाठी निवड केलेली नाही.

हेही वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत तुमचा फर्स्ट एड बॉक्स तयार आहे ना?

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार या जिल्ह्यांत कोरोना विषाणूचा प्रसार होणारा समुदाय शोधण्यासाठी अँटीबॉडी चाचणी घेतली जाईल. जिल्ह्यातील 10 क्लस्टर क्षेत्रात प्रत्येक घरातून एका व्यक्तीचे नमुने घेतले जातील. त्या व्यक्तीचे रक्त घेऊन नमुना तपासला जाईल. जेणेकरून हे कळू शकेल की, शरीरात कोरोना विषाणूविरूद्ध किती बाधा झाली आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (एनआयव्ही) एक किट विकसित केली आहे.  जी प्रथम भारतीय अँटीबॉडी किट आहे. या किटच्या माध्यमातून सुमारे अडीच तासात 90 नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते. हे किट केवळ प्रतिपिंडे (antibodies) तपासणे आणि पाळत ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकते. आतापर्यंत देशात केवळ उपचारासाठी असलेल्या आरटी पीसीआर चाचणी वैध आहे. या किटद्वारे या जिल्ह्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अशी आशा आहे की, येत्या 15 ते 20 दिवसांत त्याचे निकाल कळू शकतील.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या