उत्तर भारतासाठी 106 विशेष ट्रेन; महाराष्ट्रातील लॉकडाउनच्या चर्चेने प्रवाशांची गर्दी वाढली

उत्तर भारतासाठी 106 विशेष ट्रेन; महाराष्ट्रातील लॉकडाउनच्या चर्चेने प्रवाशांची गर्दी वाढली

महाराष्ट्रात वाढता कोरोना (Corona)संसर्ग बघता भारतीय रेल्वेने एप्रिल अखेरपर्यंत 106 विशेष ट्रेन्सचे (Special Trains) नियोजन केल्याचं घोषित केले आहे. मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी या विशेष ट्रेन्स सुरु केल्या जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : महाराष्ट्रात वाढता कोरोना (Corona)संसर्ग बघता भारतीय रेल्वेने एप्रिल अखेरपर्यंत 106 विशेष ट्रेन्सचे (Special Trains) नियोजन केल्याचं घोषित केले आहे. मुंबई, पुणे आणि सोलापूर येथून उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी या विशेष ट्रेन्स सुरु केल्या जात आहेत. प्रवाशांनी घाबरुन जाऊ नये, गरज पडेल तेव्हा ट्रेन्सची व्यवस्था केली जाईल, असे आवाहन भारतीय रेल्वेच्या (Indian Rail)सूत्रांनी केले आहे. 18 ते 20 रेग्युलर ट्रेन्स यापूर्वीपासूनच दररोज उत्तर आणि पूर्व भारतात (North And East India)सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 7 एप्रिलपासून आतापर्यंत 25 विशेष ट्रेन्स उत्तर भारतातील शहरांकडे गेल्या आहेत. याच भागांसाठी जादा ट्रेन्स सोडण्याची मागणी आहे.

मागणी वाढल्यास डुप्लिकेट ट्रेन्स सोडल्या जाणार

मागणी वाढल्यानं सोमवारी गोरखपूरसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली. सर्वच ट्रेन्स पूर्ण क्षमतेने भरून धावत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊनची चर्चा जोरात सुरु आहे, परंतु प्रवाशांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन भारतीय रेल्वेनं केलं आहे. ट्रेन्स बंद होणार नाही,असे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच प्रवास करण्यासाठी अनुमती दिली जात आहे. एखाद्या ट्रेनच्या तिकीटांची मागणी वाढली तर त्या ट्रेनच्या मागे डुप्लिकेट ट्रेन (Duplicate Train)सोडण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे. या योजनेनुसार सोमवारी रात्री मध्य रेल्वेने मुंबई ते गोरखपूर या मार्गावर डुप्लिकेट ट्रेन सोडली होती. प्रवाशांकडून मागणी वाढल्यास स्पेशल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात येईल. त्यामुळे प्रवाश्यांनी घाबरुन जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये.

मुंबईहून अन्य ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईतून बाहेर जाणाऱ्या ट्रेन्समध्ये गत सप्ताहातपासून प्रवाश्यांची गर्दी वाढली आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिली. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार,उन्हाळ्यामुळे (Summer Season)गर्दीत वाढ झाली आहे. कारण या हंगामात अनेक लोक आपल्या गावी जात असतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने कोरोनाच्या अनुषंगाने नव्या निर्बंधांची घोषणा केल्यानंतर मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाश्यांची गर्दी दिसून येत आहे. मात्र आठवडा अखेरीस ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन (Total Lock Down)लागण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर तैनात एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले की गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपासून रेल्वेगाड्याही पूर्ण क्षमतेने भरुन धावत आहेत.

रेल्वे विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की उन्हाळ्यामुळे मुंबईतून बाहेर विशेषतः उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेन्सला जास्त गर्दी आहे. कारण या कालावधीतबहुतांश लोकं लग्न सोहळे किंवा अन्य कारणांमुळे आपल्या गावी जात असतात. मध्य रेल्वेच्या एका प्रवक्त्यानं सांगितले की उत्तर भारतासाठी 12 विशेष ट्रेन्स सोडण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त 18 ते 20 नियमित ट्रेन्स दरभंगा,पाटणा,दानापूर,गोरखपूर,लखनौ,मंडूआडीह,पुरी,रक्सौल आणि गुवाहाटीसाठी सोडण्यात येत आहेत.

First published: April 13, 2021, 8:46 PM IST

ताज्या बातम्या