नवी दिल्ली 28 मे: दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर असा आरोप केला गेला आहे, की त्यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला जातो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांनी हा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांचा असा दावा आहे, की मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) चुकीच्या पद्धतीनं झेंडा लावला होता .
हेही वाचा - Breaking News: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
प्रल्हाद सिंह यांनी असा दावा केला, की ते अशाप्रकारे ध्वज लावतात, की यामुळे असं वाटतं, की ध्वजावरील हिरव्या रंगाच्या पट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. पटेल म्हणाले, की ज्याप्रकारे बॅकग्राऊंडमध्ये तिरंगा लावला जातो, ते पाहून असं वाटतं, की तिरंग्यातील पांढऱ्या रंगाचा भाग कमी करुन हिरव्या रंगाचा भाग वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा - भाविकांसाठी मोदी सरकारचं खास मिशन, थेट चार धामपर्यंत पोहोचवणार भारतीय रेल्वे
प्रल्हाद सिंह म्हणाले, की हे राष्ट्रीय ध्वज संहितेचं उल्लंघन आहे. ते म्हणाले, की जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात तेव्हा संपूर्ण लक्ष त्यांच्या खुर्चीच्या मागे लावण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाकडे जाते. हे वृत्त देईपर्यंत दिल्ली सरकार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आणि आम आदमी पार्टीकडून याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात तेव्हा त्यांच्या खुर्चीच्या मागे नेहमी तिरंगा असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Delhi News