'टिक टॉक'वर बंदी घाला, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिक टॉक या मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 07:30 AM IST

'टिक टॉक'वर बंदी घाला, मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश!

चेन्नई, 04 एप्रिल: सोशल मीडियावर सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या टिक टॉक या मोबाईल व्हिडिओ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला दिले आहेत. कोर्टाने प्रसार माध्यमांना टिक टॉकवरील व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवर दाखवू नका असे आदेश दिले आहेत.

टिक टॉक अॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ असल्याने कोर्टाने हे आदेश दिले आहेत. टॉक टॉक हे चीनमधील एका कंपनीचे अॅप असून सध्या ते भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपवर मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ असून त्यामुळे देशातील संस्कृती खराब होत असल्याचे सांगत एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत या अॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यता आली होती. यावरील सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यात तामिळनाडू सरकारमधील मंत्री ए.मनिकंदन यांनी सांगितले होते की राज्य सरकार केंद्राकडे हे अॅप बंद करण्याची मागणी करणार आहे.

काय आहे टिक टॉक अॅप

टिक टॉक अॅपच्या मदतीने छोटे व्हिडिओ तयार करुन त्याला स्पेशल इफेक्ट देतात येतात. या अॅपचे सध्या भारतात 1.3 बिलियन युझर्स आहेत.

Loading...


SPECIAL REPORT : हेच 'ते' महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे बेताल नेते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...