नवी दिल्ली, 20 जून : कोरोना महामारीमुळे (Corona) संपूर्ण भारतात शाळा आणि कॉलेज बंद आहेत. त्यात काही राज्यांनी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द (10th and 12th exams) केल्या आहेत. पहिल्या वर्गापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या अभ्यासक्रमांचे क्लासेस ऑनलाइन (Online classes) घेण्यात येत आहेत. शाळा आणि कॉलेज (Schools opening date) कधीपासून सुरु होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता सरकारकडून याबाबत उत्तर आलं आहे.
कोविडचा आलेख दररोजच्या घटनांमध्ये घट दिसून येत आहे, बहुतेक शिक्षकांच्या लसीकरणानंतरच शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे केंद्रानं म्हंटलं आहे. नीती आयोग (हेल्थ) चे सदस्य डॉ. व्हीके पॉल (V K Paul) म्हणाले, “शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताना बर्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे.
हे वाचा - पत्रकारितेत करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एम्समधील मुलांमध्ये अशाच प्रकारच्या सेरोप्रैव्हलेन्स अभ्यासाचे उदाहरण देऊन डॉ पॉल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि असे म्हटले आहे की मुलांमध्ये केसेस तुलनेने सौम्य आहेत. डॉ पॉल म्हणाले की, कोविडचा उद्रेक झाल्यानंतर अनेक देशांना पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. या महामारीमुळे आपले नुकसान होणार नाही याची खात्री होईपर्यंत शाळेत शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बोलवता येणार नाही.
शिक्षकांना संपूर्ण लसीकरण केल्यानंतर आणि आपल्या सवयी बदलल्यानंतर आणि दैनंदिन जीवनात सामाजिक अंतर अंमलात आणलं पाहिजे. अशी वेळ जर आली तरच शाळा नक्कीच पुन्हा उघडू शकतील असंही पॉल म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.