गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेवर परदेशातही SPG ची नजर, मोदी सरकारचा निर्णय

सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चार जणांना एसपीजी सुरक्षा असून त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वड्रा यांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 01:18 PM IST

गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेवर परदेशातही SPG ची नजर, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षेमध्ये बदल केला आहे. यापुढे गांधी कुटुंबीयांतील कोणीही परदेश दौऱ्यावर गेलं तर त्यांना तिथंही पूर्ण वेळ एसपीजी सुरक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. जर त्यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला तर त्यांच्या परदेश दौरा कमी करण्यात येईल. याआधी एसपीजी सुरक्षारक्षक गांधी कुटुंबातील सदस्यासोबत परदेश दौऱ्यात त्यांना पहिल्या ठिकाणी पोहचेपर्यंत सुरक्षा पुरवत होते. सुरक्षारक्षक भारतात परतल्यानंतर गांधी कुटुंबातील सदस्यांच्या परदेशातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण व्हायचा.

केंद्रानं दिलेल्या नव्या आदेशानुसार गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य परदेश दौऱ्यावर गेला तर एसपीजी सुरक्षारक्षक सदैव सोबत राहतील. कोणत्याही देशात गेले तरी तिथल्या भारतीय दूतावासासह स्थानिक पोलिस आणि एसपीजी सुरक्षाही प्रदान करण्यात येईल.

सध्या देशातील चार व्यक्तींनाच ही सुरक्षा आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वड्रा यांचा समावेश आहे.

एसपीजी सुरक्षेच्या नव्या नियमांनुसार गांधी कुटुंबाला आता त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक मिनिटाची माहिती द्यावी लागेल. त्यांच्याकडून गेल्या काही परदेश दौऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे.

एसपीजी सुरक्षा व्यवस्थेसाठी सध्या आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआयएसएपचे 3 हजारपेक्षा जास्त जवान कार्यरत आहेत. ऑगस्टमध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली. याबद्दल माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एसपीजी अॅक्ट 1988 नुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना किती धोका आहे याची माहिती घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याची समीक्षा केली जाते. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा निर्णय घेतला जातो.

Loading...

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1985 मध्ये देशात पंतप्रधानांच्या सुरेसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. या सुरक्षाव्यवस्थेला एसपीजी म्हटले जाते. यामध्ये आयपीएसचे शार्प शूटर, राज्यातील पोलिस अधिकारी, गुप्तचर संस्थेचे अधिकारी यांचा समावेश असतो.

VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: spg
First Published: Oct 7, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...