मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मृतदेहांचे खच पडलेत त्याचं काय?' बनारस मॉडेलवरून नवाब मलिकांची मोदींवर टीका

'मृतदेहांचे खच पडलेत त्याचं काय?' बनारस मॉडेलवरून नवाब मलिकांची मोदींवर टीका

Nawab Malik On Banaras Model: बनारस मॉडेल हे कोरोना लढ्यातील सर्वोत्तम मॉडेल असून याठिकाणी कोणत्याही वैद्यकीय सुविधांचा आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला नसल्याचं मोदी यांनी म्हटलं होतं. यानंतर संबंधित बनारस मॉडेलवरून देशात राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वाराणसी कंटेनमेंट मॉडेल हे कोरोना विरुद्धच्या लढाईतील सर्वोत्तम मॉडेल असून उर्वरित देशातील इतर शहरांसाठी हे रोल मॉडेल असल्याचं वर्णन केलं आहे. बनारस मॉडेल (Banaras Model) हे कोरोना लढ्यातील सर्वोत्तम मॉडेल असून याठिकाणी कोणत्याही वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवला नसल्याचं मोदी यांनी म्हटलं होतं. मोदींच्या या वक्तव्यानंतर संबंधित बनारस मॉडेलवरून देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. अपयश लपवण्यासाठी सरकारकडून खोटा प्रचार केला जात असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ प्रसारीत केला असून त्या व्हिडीओमधून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'देशात कोविडशी लढण्यासाठी बनारस मॉडेल हे सर्वोत्तम मॉडेल असल्याचा, प्रचार सध्या सरकारकडून केला जात आहे. मात्र मला वाटतं की, सरकार अपयश लपवण्यासाठी अशा प्रकारचा प्रचार करत आहे. खरंतर  बनारसच्या घाटावर कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जागा शिल्लक नव्हती.'

हे ही वाचा- भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

अनेक लोकांनी मृतदेह नदीत सोडून दिले होते. हे मृतदेह वाहून आल्यानंतर याची देशभर चर्चा झाली. असं असताना पंतप्रधान म्हणतात 'आम्ही बनारसचे जिल्हाधिकारी, तिथले डॉक्टर, रूग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधू,' असा शाब्दिक चिमटादेखील मलिकांनी यावेळी काढला आहे. वास्तविक, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार याठिकाणी शेकडो मृतदेह नदीतून वाहून आले होते. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय मीडियात भारताची चांगलीचं नाच्चकी झाली होती.

First published:

Tags: Corona spread, Narendra modi, Nawab malik