मराठी बातम्या /बातम्या /देश /केंद्र सरकारकडून लहान मुलांसाठी मोठी संधी! आयोजित केली 'ही' स्पर्धा' मिळणार बंपर बक्षिस

केंद्र सरकारकडून लहान मुलांसाठी मोठी संधी! आयोजित केली 'ही' स्पर्धा' मिळणार बंपर बक्षिस

या स्पर्धेसाठी तुम्ही कशी नोंदणी करू शकाल, याचा विषय काय आहे आणि त्याच्या नियम व अटी काय आहेत हे पाहूया.

या स्पर्धेसाठी तुम्ही कशी नोंदणी करू शकाल, याचा विषय काय आहे आणि त्याच्या नियम व अटी काय आहेत हे पाहूया.

या स्पर्धेसाठी तुम्ही कशी नोंदणी करू शकाल, याचा विषय काय आहे आणि त्याच्या नियम व अटी काय आहेत हे पाहूया.

  नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन (Hindi Diwas) म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने देशभरात हिंदी पंधरवडा (Hindi fortnight) साजरा केला जात आहे. याचंच औचित्य साधून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका निबंधलेखन स्पर्धेची (Central govt essay writing competition) घोषणा केली आहे. 16 वर्षांच्या आतल्या मुलांसाठी असलेल्या या निबंधलेखन स्पर्धेत जिंकणाऱ्या मुलाला रोख रक्कम आणि डिजिटल सर्टिफिकेट (Digital certificate) दिलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी तुम्ही कशी नोंदणी करू शकाल, याचा विषय काय आहे आणि त्याच्या नियम व अटी काय आहेत हे पाहू या.

  माहिती प्रसारण मंत्रालयाच्या (Ministry of Information and Broadcasting) डायरेक्टोरेट ऑफ पब्लिकेशन डिव्हिजनने ही निबंधलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये केवळ 8 वर्षांपेक्षा अधिक आणि 16 वर्षांपेक्षा कमी वय असणारी मुलंच सहभागी (Rules for Essay writing competition) होऊ शकतील. यासाठी मुलांना ‘प्लास्टिक हटाओ, पर्यावरण बचाओ’ (Plastic Hatao, Paryavaran Bachao) या विषयावर हिंदीमध्ये निबंध लिहायचा आहे. यातल्या विजेत्या निबंधाला रोख बक्षीस (Cash price for essay) दिलं जाणार आहे. सोबतच, हा निबंध बालभारती या मासिकामध्येही प्रकाशित केला जाणार आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  हे वाचा - NIRF Ranking 2021: देशातील टॉप 10 कॉलेजेस आणि विद्यापीठं जाहीर; बघा यादी

  ‘प्लास्टिक हटाओ, पर्यावरण बचाओ’ हेच या स्पर्धेचं नाव आहे. या स्पर्धेसाठी 500 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. हा निबंध कुठूनही बघून लिहायचा नाही. हा निबंध (India govt essay competition) पूर्णपणे स्पर्धकानेच लिहायचा आहे. तसंच, यामध्ये लेखकाची स्वतःची मतंही असायला हवीत. या सर्व नियमांचं पालन करूनच स्पर्धेसाठी निबंध (Essay competition on Hindi Diwas) पाठवायचा आहे, अन्यथा तो रिजेक्ट केला जाणार आहे. ही स्पर्धा 8 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. 14 सप्टेंबर 2021 पर्यंत या स्पर्धेसाठी निबंध पाठवता येणार आहेत. या तारखेनंतर आलेले निबंध स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. निबंध पाठवण्यासंबंधी आणि स्पर्धेची नोंदणी करण्यासंबंधी अधिक माहिती भारत सरकारच्या MyGov.in या वेबसाइटवर मिळू शकते.

  ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुलाला एक हजार रुपये रोख आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 750 रुपये आहे, तर तिसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला 500 रुपये बक्षीस दिलं जाणार आहे. यासोबतच सर्वांना डिजिटल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राची हार्डकॉपी देण्यात येणार नाही. त्यामुळे, स्पर्धेसाठी नोंदणी करताना आपला योग्य ई-मेल आयडी देणं गरजेचं आहे.

  First published:

  Tags: Central government