अनेक राज्यात होतायत शाळा सुरु देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु होत आहे. वरच्या वर्गांच्या शाळा काही राज्यांनी सुरु केल्या आहेत. तर अनेक राज्यात शहरी भागातील शाळा मात्र अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचं नियोजन बहुतांश राज्यं करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांनी अगोदर शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करावं, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. अतिरिक्त डोस पुरवणार देशातील सर्व राज्यांनी शिक्षकांचं लसीकरण अग्रक्रमानं करण्याच्या सूचना देतानाच राज्यांना लसींचा अतिरिक्त पुरवठा करणार असल्याचंही केंद्रीय आरोग्यमत्र्यांनी सांगितलं आहे. यासाठी देशभरात 2 कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त लसी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली आहे. शिक्षकदिनापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठीच या अतिरिक्त डोसचा वापर करण्याच्या सूचनाही राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत. हे वाचा -ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण, 'या' मुलांना असेल प्राधान्य शिक्षकांचं लसीकरण गरजेचं लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. लहान मुलांवर कोरोना विषाणूचा फारसा परिणाम होत नसला, तरी मुलं विषाणूची वाहक असतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका हा शिक्षकांना असतो. त्यामुळेच शिक्षकांचं लसीकरण करून त्यांना कोरोना संसर्गापासून संरक्षित करणं, या बाबीला आपली प्राथमिता असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.इस महीने हर राज्य को वैक्सीन उपलब्ध करवाने की योजना के अतिरिक्त 2 करोड़ से ज़्यादा वैक्सीन की डोज़ उपलब्ध कराई जा रही हैं।
हमने सभी राज्यों से अनुरोध किया है कि 5 सितंबर को मनाये जाने वाले शिक्षक दिवस से पहले सभी स्कूली शिक्षकों को प्राथमिकता देकर वैक्सीन लगाने का प्रयास करें। — Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, School teacher, Teacher