मराठी बातम्या /बातम्या /देश /

सर्वात मोठी बातमी: जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार स्वतंत्र राज्याचा दर्जा? पंतप्रधान मोदी लवकरच देणार ब्लु प्रिंट

सर्वात मोठी बातमी: जम्मू-काश्मीरला पुन्हा मिळणार स्वतंत्र राज्याचा दर्जा? पंतप्रधान मोदी लवकरच देणार ब्लु प्रिंट

जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 20 जून: केंद्रात असणाऱ्या भाजपच्या सरकारकडून (Government of India) 5 ऑगस्ट, 2019 रोजी जम्मू-काश्मिरातील कलम 370 (Article 370) हटवण्यात आलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) आणि लद्दाख (Ladakh) हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार कारणात आले होते. तेव्हापासूनच जम्मू काश्मिरातील काही राजकीय संघटनांचा आणि पक्षांचा याला विरोध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi) त्यावेळी जम्मू- काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यावर आता अंमलबजावणी सुरू होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी भूतकाळात दिलेल्या आश्वासनांनुसार जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा येईल, परंतु या प्रदेशाचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे जम्मू - काश्मिरातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांशी येत्या गुरुवारी चर्चा करणार आहेत.

हे वाचा - बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना पोलिसांनी पकडलं

या पार्श्वभूमीवर 24 जूनची बैठक महत्त्वपूर्ण आहे, कारण जम्मू-कश्मीरातील काही राजकीय पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात थेट चर्चेची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) यासारख्या प्रादेशिक बलाढ्य पक्षांच्या प्रतिनिधींना तसंच केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (BJP) आणि इतर कॉंग्रेसच्या (Congress) प्रतिनिधींना दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केलं गेलं आहे.

जम्मू-काश्मीर स्वतंत्र म्हणून घोषित करण्याचा सरकार विचार करत आहे, परंतु गेल्या वर्षाच्या प्रारंभीच्या सीमांकन आयोगानं आपला अहवाल सादर करतपर्यंत सरकारला वाट बघावी लागेल अशी चिन्हं दिसताहेत. असं असेल तरी लद्दाखच्या स्थितीत कोणताही बदल होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

श्रेय अजित डोवाल यांचं

कलम 370 हटवण्यात आल्यानंतर NSA अजित डोवाल (NSA Ajit Doval) काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी खोऱ्यातील फुटीरवाद्यांशी चर्चा करत होते. कित्येक महिने जम्मू-काश्मिरातील स्थिती बघत त्यांनी स्वतंत्र राज्याची रणनीती तयार केली आहे. हे त्यांच्या प्रयत्नांना आलेलं यश म्हणता येईल.

हे वाचा - बापाचं प्रेम पाहून येईल डोळ्यात पाणी;भर पावसात मुलीच्या अभ्यासाठी छत्री घेऊन उभा

जम्मू-काश्मिरात लवकरच निवडणूक?

2018 पासून प्रलंबित असलेल्या  प्रदेशात लवकरच निवडणुका घेण्यात येतील असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व पक्षांना देतील. सर्व स्थानिक पक्ष निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ शकतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

First published:

Tags: Delhi, Jammu and kashmir, Modi government