Home /News /national /

Twitter ला काश्मीरचा वादग्रस्त नकाशा दाखवणं भोवणार, केंद्राने पाठवली नोटीस

Twitter ला काश्मीरचा वादग्रस्त नकाशा दाखवणं भोवणार, केंद्राने पाठवली नोटीस

भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केंद्राने केली आहे. त्याच बरोबर 5 दिवसांमध्ये उत्तर द्या असंही बजावलं आहे.

    नवी दिल्ली 12 नोव्हेंबर:  लेह (Leh) या भागाला केंद्र शासित प्रदेश लडाख (Ladakh) मध्ये दाखवण्या ऐवजी जम्मू आणि कश्मीर (Jammu Kashmir) मध्ये दाखविल्याने केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) ला नोटिस पाठवली आहे. भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये असं केंद्राने ट्विटरला बजावलं आहे. त्याच बरोबर 5 दिवसांमध्ये उत्तर द्या असंही बजावलं आहे. द इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राच्या महासंचालकांनी ही नोटीस पाठवली आहे. लेह आणि लडाखला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा केंद्राने ऑगस्ट 2019मध्ये दिला होता. या आधी ट्विटरने जम्मू-काश्मीर हा चीनचा भाग असल्याचं दाखवलं होतं. त्यानंतर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर ती चूक दुरुस्त करण्यात आली होती. मात्र लेह हा लडाख सोबतच केंद्र शासित प्रदेश असल्याची चूक ट्विटरने अद्याप दुरुस्त केली नाही. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. काय होतं आधीचं प्रकरण ट्विटर इंडिया (Twitter India) ने जम्‍मू-कश्‍मीर (Jammu Kashmir) ला चीनचा (China) भाग असल्याचं दाखवलं होतं.  एका ट्विटर यूजरने लोकेशन टॅग केल्यावर (Geo Tag) जम्मू काश्मीर, रिपब्लिक ऑफ चायना, असं आलं. यावरून इंटरनेटवर यूजर्स प्रचंड भडकले होते. तातडीने हे उद्योग करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढंच नाही तर Twitter वर बंदी (Twitter Ban) आणा, अशीही मागणी झाली होती. बिहारमध्ये चलबिचल! भाजपच्या विजयोत्सवानंतर नितीश कुमारांचं पहिलं मोठं वक्तव्य अशा प्रकारे जम्मू काश्मीरला चीनमध्ये दाखवत असल्याचं प्रथम लक्षात आलं ते ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या कांचन गुप्ता यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर. कांचन गुप्ता यांनी Tweet करून याबद्दल नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. 'ट्विटरने आता भूगोल बदलण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. जम्मू काश्मीरला त्यांनी चीनचा भाग म्हणून घोषित केलं आहे. हे भारतीय कायद्याचं उल्लंघन नाही तर काय आहे? अमेरिकन कंपनी कायद्यापेक्षा मोठी आहे काय?' या त्यांच्या Tweet ने खळबळ उडाली होती. नंतर ट्विटरने ती तांत्रिक चूक असल्याचं म्हणत योग्य नकाशा दाखवला होता. आता ट्विटर काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Twitter

    पुढील बातम्या