कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; आता दुकानदार साठवू शकणार एवढाच कांदा

कांद्याच्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्राचा प्लॅन; आता दुकानदार साठवू शकणार एवढाच कांदा

कांद्याच्या किंमतीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याच्या वाढत्या किमतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं आहे. केंद्र सरकारने विविध राज्यांना त्यांच्या गरजेनुसार, कांदा पुरवठा केला असल्याचं सांगितलं आहे.

आजपासून कांद्याची साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा 25 मेट्रिक टन आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी 2 मेट्रिक टन, करण्यात आल्याची माहिती लीना नंदन यांनी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदार केंद्राने दिलेल्या नियमांनुसारचं कांद्याची साठवण करू शकणार आहे.

कांद्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात स्थिरता राखण्यासाठी आतापर्यंत 35 हजार मेट्रिक टन कांदा राज्यांना देण्यात आल्याची माहिती, ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी दिली आहे. कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सतत कृतीशील पावलं उचलली गेली आहेत. परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुलनेने स्थिर असलेल्या किंमतीतमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात झालेल्या पावसामुळे कांद्याच्या भावात वाढ झाल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व भागात कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या बाजारात कांद्याचा भाव 70 ते 100 रुपये एक किलोपर्यंत गेला आहे. दिवाळीपर्यंत हा भाव 120 ते 150 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो. साधारणपणे मागील दोन आठवड्यांपर्यंत सर्वसाधारण भावामध्ये कांदा विकला जात होता. पण अचानक एका दिवसातच कांद्याच्या दरात क्विंटलमागे 2 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे इतर दिवशी 30 ते 40 रुपये असणारा कांदा अचानक 70 ते 100 रुपये किलोने विकला जाऊ लागला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 23, 2020, 5:43 PM IST
Tags: onion

ताज्या बातम्या