श्रीनगर, 03 मार्च : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. एअर स्ट्राईक कारवाईनंतर बिथरलेला पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या पार्श्वभूमीवर, सीमारेषा परिसरतील नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर ठेवत उपाययोजना राबवण्याचे काम जम्मू काश्मीर प्रशासनाने हाती घेतली आहे. यासाठी,पूंछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये अतिरिक्त 400 बंकर्स उभारण्यास केंद्र सरकारने शनिवारी(3मार्च) मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्याभरात पूंछ आणि राजौरीमध्ये पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सीमा रेषेवर सातत्याने होणारा तुफान गोळीबार पाहता पूंछमध्ये 200 आणि राजौरीमध्ये 200 अतिरिक्त बंकर्स उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील महिन्याभरात या बंकर्सचे बांधकाम पूर्ण होईल. हे बंकर्स जलद गतीनं उभारण्यात यावेत, यासाठी शासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सीमारेषेवर केल्या जाणाऱ्या गोळीबारामुळे प्रचंड नुकसान होत आहे. हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत.
दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सीमारेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आणि जैश-ए-मोहम्मदची अनेक तळं उद्धवस्त केली. या कारवाईमध्ये कित्येक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पण यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराचे जवान सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत.
J&K: Central Government has sanctioned additional 400 individual bunkers for Poonch and Rajouri districts with 200 additional bunkers for each district.The bunkers would get built in the next one month as per the prescribed specifications. pic.twitter.com/OrxDrQhX2i
— ANI (@ANI) March 3, 2019